मानोरी : परिसरातील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली असून येथील मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दोन किलोमीटर अंतरापैकी एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चार वर्षांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होत असून देखील संबंधित प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. अखेर दरवर्षाप्रमाणे यंदाही येथील स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत खडकीमाळ ते मानोरी बुद्रुक या रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे स्वखर्चाने मुरूम टाकून बुजविले आहेत.मानोरी - खडकीमाळ या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पादचाऱ्यांसह वाहन चालकांना या रस्त्याने रहदारी करणे अवघड बनले होते. खड्ड्यांच्या साम्राज्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण होत होता. मानोरी बुद्रुक, मानोरी खुर्द, हनुमाननगर, वाकद, देवगाव आदी परिसरातील नागरिकांना येवला येथे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. बाजार समित्यात आपला शेतमाल विक्र ीसाठी घेऊन जाण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मानोरी गावात येणारी येवला आगाराची बस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद झाली होती. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भल्या पहाटे खडकीमाळ येथे दोन किलोमीटर पायी चालत जावे लागत होते. गतवर्षी ‘लोकमत’ने या रस्त्याचा प्रश्न मांडला असता ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेऊन या खड्ड्यांवर मुरूम टाकून ते बुजविण्यात आले होते. मात्र आता पुन्हा जैसे थे झाल्याने ग्रामस्थांनी अजून किती वर्षे स्वखर्चाने खड्डे बुजवावीत असा प्रश्न ग्रामस्थात उपस्थित केला जात आहे.
ग्रामस्थांनी स्वखर्चाने केली मानोरी बुद्रुक रस्त्याची दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 5:27 PM
परिसरातील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली असून येथील मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दोन किलोमीटर अंतरापैकी एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चार वर्षांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होत असून देखील संबंधित प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. अखेर दरवर्षाप्रमाणे यंदाही येथील स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत खडकीमाळ ते मानोरी बुद्रुक या रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे स्वखर्चाने मुरूम टाकून बुजविले आहेत.
ठळक मुद्देशुभ वर्तमान : डांबरीकरणाच्या मागणीकडे दुर्लक्ष