लोकमत न्यूज नेटवर्कनगरसुल : येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या २० रुग्णांपैकी ठणठणीत बरे झालेल्या चार रुग्णांना सोमवारी (दि.२२) सकाळी घरी सोडण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे, डॉ. मदनुरे , परिचारीका खेडकर सिस्टर व सर्व अधिकारी, कर्मचाºयांच्या परिश्रामाने तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने सदर चार रु ग्ण बरे झाले व त्यांना आज घरी सोडण्यात आले. सदर रूग्णांना सात दिवस होम क्वारण्टाइन करण्यात आल्याची माहिती डॉ. सुर्यवंशी यांनी दिली .येवला तालुक्यात कोरोनाचा कहर असतांनाच नगरसुल गावांमधून चार रु ग्ण बरे होऊन घरी गेल्याने डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे. येवला शहर, तालुक्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना कालपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून तालुक्याचा एकूण आकडा १०९ झाला आहे. त्यात येवला शहर, राजापूर, बाजीरावनगरचा समावेश आहे. आतापर्यंत पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यातील ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला मालेगावात कोरोनाचा कहर मोठा वाटत होता . आता नाशिक शहरातील रुग्णांचा आकडा वाढत आहे. नागरिक दुकाने, भाजी बाजार या ठिकाणी मास्क न लावता गर्दी करताना दिसत होते. पोलीस यंत्रणेचा वचक राहिला नसल्याने काही दुकानदार शासकीय नियमांचे पालन न करता अर्धे शटर उघडे ठेवून दुकाने सुरु ठेवत होते.
नगरसूल ग्रामीण रुग्णालयातून चौघे कोरोनामुक्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचे गावकऱ्यांनी केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 9:34 PM
नगरसुल : येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या २० रुग्णांपैकी ठणठणीत बरे झालेल्या चार रुग्णांना सोमवारी (दि.२२) सकाळी घरी सोडण्यात आले.
ठळक मुद्देघरवापसी : रुग्णांना निरोप; येवला शहरासह तालुक्यात आतापर्यंत ५१ रूग्णांना दिलासा