दरम्यान, पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्याने रस्ता खुला करता आला नसल्याचे तहसीलदार बी. ए. कापसे यांनी सांगितले, मात्र आंदोलकांनी आंदोलनावर ठाम राहून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर रात्री मुक्काम ठोकून आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच ठेवले.
या आंदोलनात महिला सहभागी झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देत रस्ता खुला करण्याची मागणी केली. कळवण येथील प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर शिरसमनी येथील ग्रामस्थांनी हे आंदोलन सुरू केले असून, शुक्रवारी हे आंदोलन सुरूच होते. रात्रभर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच मुक्काम ठोकला असून, या आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या आहेत. हा रस्ता लवकरात लवकर खुला करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आंदोलनात भालचंद्र वाघ, सुभाष शिरसाठ, उत्तम शिरसाठ, बापू वाघ, संजय वाघ, मुरलीधर वाघ, राहुल भामरे, बापू वाघ, दत्तू वाघ, दिलीप पवार, मुन्ना पवार, नीलेश वाघ, हिरामण वाघ, सुनील वाघ, राजेंद्र आहेर, हेमंत गवांदे, दत्तू शिरसाठ, हिरामण आहेर, नंदू पवार, लालूसिंग परदेशी, भाऊसाहेब देवरे, अनिल वाघ, नाना शिरसाठ, अशोक भामरे, ब्रह्मा पवार, संजय शिरसाठ, राजेश्वर शिरसाठ आदींसह महिला सहभागी झाल्या आहेत.
इन्फो
तारीख पे तारीख
कळवण तालुक्यातील शिरसमणी गाव ते सावळदर शिवार रस्ता सन १९९० साली तहसीलदारांनी खुला करण्याचा आदेश दिलेला होता. १९९२ मध्ये तत्कालीन प्रांताधिकारी यांनी हा आदेश कायम ठेवला होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तहसील व प्रांत कार्यालयात पाठपुरावा करूनही सदर रस्ता खुला करण्यात आला नाही. तहसीलदार बी. ए. कापसे यांनी २९ जून, ५ जुलै व ७ जुलै रोजी या तारखांना रस्ता खुला करण्याबाबत लेखी कळविले होते. परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने आणि रस्ता खुला न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्धार केला आहे.
कोट...
शिरसमणी ते सावळदर रस्ता खुला करण्याचा प्रश्न ३० वर्षांपासून प्रलंबित आहे, ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन दिले असून, रस्ता खुला करण्याचे यापूर्वी आदेश कायम आहेत. आत्ता केवळ पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्याने रस्ता खुला करण्यात आला नाही. बंदोबस्त मिळाल्यानंतर तत्काळ रस्ता खुला केला जाईल.
-
बी. ए. कापसे,
तहसीलदार, कळवण
फोटो- ०९ कळवण आंदोलन
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर आंदोलनास बसलेल्या ग्रामस्थांसमवेत रवींद्र देवरे, हिरामण वाघ, अमित देवरे.
090721\09nsk_18_09072021_13.jpg
फोटो- ०९ कळवण आंदोलन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर आंदोलनास बसलेल्या ग्रामस्थांसमवेत रविंद्र देवरे,हिरामण वाघ, अमित देवरे.