खामखेडा : गिरणा नदीपात्र कोरडे पडल्याने गिरणा नदीच्या काठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.कळवण-सटाणा-देवळा आदि तालुक्यातील गावाचा पाणी पुरवठा व शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलबुन आहे. पूर्वी गिरणा नदी बारमाही दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे ह्या गावांना मुबलक पाणी मिळत असे. तसेच खामखेडा परिसरातील शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबुन आहे.या नदी परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी सोसायटी, बॅँक आदि संस्थानकडून कर्ज काढून या गिरणा नदी काठावर विहिरी खोदून लाखो रु पये खर्च करून पाईप लाईनद्वारे खामखेडा परिसरातील शेती ही मोठ्या प्रमाणात गिरणा नदीच्या पाण्यावर अवलबुंन आहेत.शिवारातील विहिरींनी गेल्या दोन महिन्यापूर्वी तळ गाठला. आता शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलबुन आहे. परंतु गेल्या एक महिन्यापासून नदी पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने नदी काठावरील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आता गिरणा नदीच्या काठावरील गावांना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरांचा चारा कसा सांभाळायचा असा प्रश्न शेतकºयांला पडला आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने नदी पात्र कोरडे पडल्याने गावाचा पाणी प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.आता गिरणा काठावरील शेतीला गिरणा नदीला चणकापुर धरणातून केव्हा अवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार याची वाट पाहत आहेत.
नदी काठावरील गावांनाही जाणवू लागली पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 7:23 PM
खामखेडा : गिरणा नदीपात्र कोरडे पडल्याने गिरणा नदीच्या काठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.
ठळक मुद्दे धरणातून केव्हा अवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार याची वाट पाहत आहेत.