नाशिक : हेल्मेटचा वापर न करता दुचाकी चालविणाऱ्या २०८ दुचाकीचालकांवर शुक्रवारी (दि.३) वाहतूक पोलीस व शहरपोलिसांनी एकत्रित कारवाई केली. शहरात शुक्रवारी अचानक विविध भागांत वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने अनेक दुचाकीचालकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले, अनेकांनी दुचाकीला अडकवलेले हेल्मेट काढूले, तर अनेकांनी रस्ता बदलून पळ काढला. मात्र तरीही २०८ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात यश आले. हेल्मटसक्तीसंदर्भात आग्रही असलेल्या नाशिक पोलिसांनी शुक्रवारी दिवसभरात सुमारो दोनशेहून अधिक दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत सुमारे एक लाख चार हजार रुपयांचा दंड वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे प्रमाणही वाढीस लागलेले असताना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी एकत्रित हेल्मेटसक्ती मोहिमेअंतर्गत कारवाई केल्याने अनेक वाहनचालक ांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
विनाहेल्मेट दोनशे चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 11:47 PM
नाशिक : हेल्मेटचा वापर न करता दुचाकी चालविणाऱ्या २०८ दुचाकीचालकांवर शुक्रवारी (दि.३) वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी एकत्रित कारवाई केली. शहरात शुक्रवारी अचानक विविध भागांत वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने अनेक दुचाकीचालकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले, अनेकांनी दुचाकीला अडकवलेले हेल्मेट काढूले, तर अनेकांनी रस्ता बदलून पळ काढला. मात्र तरीही २०८ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात यश आले.
ठळक मुद्देपोलिसांची मोहीम : अचानक राबविलेल्या मोहिमेमुळे तारांबळ