विंचूर : ठेकेदारांकडुन हलगर्जीपणाने झालेली कामे, महावितरणचा मनमानीपणा अन वादळी वा-याचा हैदोस यामुळे विंचूरकरांसह कांदा व्यापा-यांना मोठा त्रास सहन करावा लागला. सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने कांदा व्यापा-यÞांचे लाखोंचे नुकसान झाल्याने अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. तर दुसरीकडे महावितरणचा सोमवारी सायंकाळी खंडीत झालेला वीजपुरवठा दुस-या दिवशी दुपारनंतर उशिरा सुरु झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या चार दिवसांपासून दिवसभर प्रचंड़ उकाडा आणि सायंकाळ नंतर ढग जमा होणे असा नित्यक्र म झाल्याने मान्सूनच्या आगमनाने नागरिक सुखावले असले तरी प्रचंड वादळी वारा आणि महावितरण या दोघांनी नागरिकांचे हाल केले. सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान वीजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह पावसाला सुरु वात झाली. प्रारंभी पाऊस कमी आणि वादळी वारा जास्त असल्याने रस्त्यावरील नागरिकांनी आडोसा शोधण्याचा प्रयत्न केला. परिसरात काही शेतक-यांच्या बागांमधील झाडे वादळात भुईसपाट झाली. पावसाचा जोर वाढु लागल्याने रस्त्यावरु न मोठ्यÞा प्रमाणात पाणी वाहु लागले. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीच्यÞा विंचूर येथील उपबाजार आवारातील कांदा व्यÞापा-यांचे तीन शेड तर निफाड रस्त्यालगत असलेल्यÞा दहा ते बारा व्यापा-यांचे कांदा शेड वादळात अक्षरश: जमीनदोस्त झाले. काही शेड पुर्णपणे उघडे पडल्याने त्यात साठवलेला कांदा पाण्यात भीजला. परिणामी येथील कांदा व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व्यापारी हवालिदल झाले आहेत.
विंचूरला वादळी पावसाने दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 2:34 PM