शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

विंचूरला दोन दिवसांपासून संततधार

By admin | Published: August 04, 2016 12:39 AM

विंचूरला दोन दिवसांपासून संततधार

 विंचूर : येथे सोमवारी रात्रीपासून हलक्या स्वरूपात पावसाला सुरु वात झाली. नंतर वाढत जाऊन काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळून आजही रिमझिम सुरूच होती. येथील पर्जन्यमापक यंत्रावर ९५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.मुसळधार पावसामुळे दिवसभर येथील तीनपाटीवर व मुख्य बाजारपेठेत बंदसदृश स्थिती होती, तर गावात शुकशुकाट दिसून येत होता. कामानिमित्त परगावी गेलेल्या येथील नागरिकांना घरी परतण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. तसेच येथे मोठ्या प्रमाणात धाब्याची घरे असल्याने या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे गळू लागली. त्यामुळे अनेक कुटुंबांना एका कोपऱ्यात बसून संपूर्ण दिवस काढावा लागला. तरी पावसाच्या पाण्याप्रमाणे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या दमदार पावसामुळे चालू वर्षात प्रथमच लोणगंगा नदीला पूर आला. पूर बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. प्लॅस्टिकच्या कागदांना व छत्र्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली. गेल्या दोन-तीन वर्षाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दमदार पावसाच्या हजेरीने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)