दिंडोरी : येथे विंध्यवासिनी देवीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि. १०) देवी मंदिर ते दिंडोरी गावापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १२ रोजी सकाळी ८ वाजता पूजेला प्रारंभ होणार आहे. यावेळी मंगलचरणम, शांतिसुक्त पठण, नांदिश्राद्ध, नवग्रह होम, स्तुतिपाठ व कुटीर होम इत्यादी होम-हवन होणार आहेत. दि. १३ रोजी मंडल देवता पूजन, महादेव-नंदी अभिषेक, बिल्वआर्चन, पर्याय हवन, संस्कार मूर्ती न्यास इत्यादी धार्मिक विधी होतील. दि. १४ रोजी मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल. यावेळी मूर्तिस्थापना, ध्वजारोहण, महाआरती, कलशारोहण व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष देवीदास दंडगव्हाण, उपाध्यक्ष सुरेश दुसाने, सचिव कृपेश पवार, समीर मैद, श्रीकांत खाणीवाले, संजय राऊत, वसंत दंडगव्हाण, समीर वाघ, श्वेता जोशी आदींनी केले आहे.
विंध्यवासिनी देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:10 AM