लासलगाव : येथील बाजार समितीच्या उगाव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर सोमवारपासून (दि.३) द्राक्षमणी लिलाव सुरू होणार आहे.उगाव येथील खरेदी-विक्री केंद्रावर आपला द्राक्षमणी हा शेतमाल प्रतवारी करून विक्र ीसाठी आणल्यास वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केली आहे. द्राक्षमणी खरेदीसाठी व्यापारी इच्छुक असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे.शेतकऱ्यांनी आपला द्राक्षमणी हा शेतमाल खरेदी-विक्र ी केंद्रावरच विक्र ी करावा, असे आवाहन सभापती सुवर्णा जगताप व उपसभापती प्रीती बोरगुडे यांनी केले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणाºया द्राक्षमणी खरेदीदारांवर कायद्याशीर कारवाई करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आलेलेआहेत. बाजार समितीच्या उगाव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी खरेदीस इच्छुक असलेल्या व्यापाºयांनी परवानासंबंधीच्याअटी पूर्ण केल्यास संबंधित व्यापाºयांना तत्काळ परवाना देण्यात येणार आहे. तसेच खरेदी-विक्र ी केंद्रावर पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक व्यापाºयांनी बाजार समितीच्या लासलगाव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जगताप व बोरगुडे यांनी केले आहे.
उगाव खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 11:30 PM