जोरण - जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले असून बागलाण तालुक्यातील विंचुरे येथील शेतकरी महारु दोधा गायकवाड (वय ५५) ह्या शेतक-याचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे.महारु गायकवाड यांची अचानक तब्येत बिघडली असता त्यांचा मुलगा समाधान गायकवाड याने सटाणा येथील खाजगी रु ग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन त्यांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या असता त्यांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गायकवाड यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकिय रु ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच गुरु वारी (दि.२०) उपचारादरम्यान महारु गायकवाड यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूने थैमान घातले असून बळींची संख्या वाढत आहे. त्यामुळे, नागरिकांनी धसका घेतला आहे.
विंचुरेच्या शेतक-याचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 4:47 PM
जोरण - जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले असून बागलाण तालुक्यातील विंचुरे येथील शेतकरी महारु दोधा गायकवाड (वय ५५) ह्या शेतक-याचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे.महारु गायकवाड यांची अचानक तब्येत बिघडली असता त्यांचा मुलगा समाधान गायकवाड याने सटाणा येथील खाजगी रु ग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन ...
ठळक मुद्देगेल्या काही दिवसात जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूने थैमान घातले असून बळींची संख्या वाढत आहे