येथील जुना आग्रा रोडच्या दुभाजकासह काँक्रिटीकरण करण्यासोबत आरसीसी नालाकामासाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. माजी आमदार रशीद शेख यांनी या कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (दि. १५) आयोजित केला होता. या प्रकाराची मनपा व पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत शेख यांच्यावर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून गर्दी जमविली म्हणून पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, रशीद शेख यांनी विनापरवानगी भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली.
इन्फो...
राज्य शासनाने कोरोनाचे निर्बंध सर्वसामान्य नागरिकांसाठी कडक केले असताना मालेगावी लोकप्रतिनिधींकडूनच नियमांची वारंवार पायमल्ली होत असल्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या आठवडाभरापूर्वी माजी आमदार आसिफ शेख यांनी शक्तिप्रदर्शन करीत मोठ्या संख्येने गर्दी जमवून जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर भूमिपूजन सोहळा घेऊन रशीद शेख यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्याची घटना घडली आहे.
===Photopath===
150321\15nsk_37_15032021_13.jpg~150321\15nsk_38_15032021_13.jpg
===Caption===
मालेगावी जुना आग्रारोडच्या भूमीपुजन कार्यक्रम प्रसंगी सोशल डिन्ससिंगचा उडालेला असा फज्जा. ~मालेगावी जुना आग्रारोडच्या भूमीपुजन कार्यक्रम प्रसंगी सोशल डिन्ससिंगचा उडालेला असा फज्जा.