देवळा : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा देणारे मेडीकल, किराणा, दूध, व भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देवळा शहरात नगरपंचायतीच्या वतीने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानात फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु भाजीपाला मार्केटमध्ये मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असून काही भाजीपाला विक्र ेते नगरपंचायत कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.कोरोनाविषयी काही विक्र ेते गंभीर असल्याचे चित्र एकीकडे दिसत असतानाच काही विक्र ेते व नागरिकांकडून मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नागरीकांना होऊ नये यासाठी देवळा नगरपंचायतीने शहरातील दुकानदारांना दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ ठरवून दिली असून कोरोनासंदर्भात खबरदारी घेण्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या आहेत. औषधे, भाजीपाला, किराणा, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना तसेच बँकेत जातांना मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत ग्राहक एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर राहिले तर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या हाच एकमेव उपाय असतांना व याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. यावेळी विकास आहेर, माणिक आहेर, सुरेश आहेर, वसंत आहेर, शशी मेतकर, किरण गुजरे, मोहन सिलावट, नाना आहेर, शुभम आहेर, योगेश आहेर, चंद्रकांत चंदन, आदी नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.देवळा येथील भाजीपाला मंडईत फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. देवळा नगरपंचायतीचे कर्मचारी भाजीपाला विक्र ेत्यांना व ग्राहकांना वारंवार सुचना देतांना दिसत आहेत. परंतु काही बेजबाबदार विक्र ेते व ग्राहक या सुचनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे भविष्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नगरपंचायतीने कठोर उपाययोजना करावी, अश्ी मागणी नागरीकांकडून होत आहे.
देवळ्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 7:23 PM