नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिर परिसरात महिला पोलीस अधिकाºयाला धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणणाºया विलास बाळासाहेब तुंगार याच्याविरुद्ध त्र्यंबक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२१) महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी लोटली होती. भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरातही भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस फौजफाटा तैनात होता. पोलीस यंत्रणा कार्यरत असतानाच संशयित विलास बाळासाहेब तुंगार (रा. त्र्यंबकेश्वर) मंदिर गर्भगृह मार्गात उभे होते. पोलीस उपनिरीक्षक असलेल्या एका महिला अधिकाºयाने मंदिर मार्गातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्येच उभे असलेल्या तुंगार यांना दर्शन झाले असल्यास बाजूला जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने तुंगार यांनी महिला अधिकाºयाशी वाद घालण्यास सुरुवात केली. मी येथील मंदिराचा मालक आहे, तुम्ही कोण लागून गेल्या असे सांगत तुंगार याने सदर महिलेला हाताने मागे ढकलले व मी कोण आहे, हे तुला दाखवितो, असे म्हणत धमकी दिली. सदर प्रकार महिला पोलीस अधिकाºयाने उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या कानावर घातला. त्यानंतर महिला पोलीस अधिकाºयाने फिर्याद दिली.विलास बाळासाहेब तुंगार याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५३ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, कॉन्स्टेबल दीपक पाटील करीत आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरात महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:03 AM
महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिर परिसरात महिला पोलीस अधिकाºयाला धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणणाºया विलास बाळासाहेब तुंगार याच्याविरुद्ध त्र्यंबक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देगुन्हा दाखल । महाशिवरात्रीच्या दिवशी घडली घटना