इंदिरानगर : हिंसाचारमुक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन साहित्यिक रामदास फुटाणे यांनी प्रतिपादन केले. हिरे मित्रमंडळाच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फुटाणे म्हणाले, शिक्षकाने डोळस राहून, पुस्तकांशी संवाद ठेवला पाहिजे, वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रु जवून शिक्षक म्हणून विद्यार्थीप्रिय शिक्षक व्हा, आजकालच्या तरुण पिढीचा मोबाइल, टीव्हीकडे कल वाढला असून, अध्यापन करताना यातून त्यांची मानसिकता आणि संस्कार यांची सांगड घालणे जिकरीचे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे नाशिक जिल्हा महिला विकास बँकेच्या अध्यक्ष डॉ. योगीताताई हिरे, श्रीशक्ती शैक्षणिक संस्थेचे सचिव दीपक सोनवणे, निवृत्ती गवळी, राजू कडवे, अॅड. जगदीश काजळे, गणेश जाधव, कामिनी घोडके, एन. के. देवरे, माजी प्राचार्य हरिश आडके, प्रा. श्याम पाटील, मांगीलाल महाले, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, विश्वस्त प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, प्राचार्य आर. एस. भांबर, भिला अहिरे, रामकृष्ण पाटील, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मधुकर पवार यांनी केले.पुरस्कारार्थी असेउपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेल्या माधुरी पाटोळे यांच्या आई अलका पाटोळे प्राथमिक विभागातून, राज्य ईश्वर पाटील, नितीन पाटील, पंढरीनाथ कदम, योगेश सूर्यवंशी, संजीवकुमार पाटील, रमाकांत जगताप, मकरंद जाधव, प्रसन्न पाटील, माध्यमिक विभागातून, वैशाली डूमरे, प्रिया पोतदार, नीलेश ठाकूर, प्रकाश भामरे, राजू शेवाळे, राजेंद्र बच्छाव, उच्च माध्यमिक विभागातून विक्र म काकूळते, सुभाष पाटील, मैथिली लाखे, किशोर चौधरी, वरिष्ठ महाविद्यालय विभागातून, डॉ. अमोल गायकवाड, किरण शेंडे, डॉ. सुनील अमृतकर, आशा ठोके, कला, क्र ीडा, संगीत विभागातून अण्णासाहेब शिरोळे, दिलीप पवार, संतोष लहाने, उच्च तंत्रशिक्षण विभागातून डॉ. योगेश सदगीर, शिवाजी हांडे यांचा समावेश होता. विशेष पुरस्कारात दत्तात्रय सूर्यवंशी, संजीवनी शिवांगे आदींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह सन्मानित करण्यात आले.
हिंसाचारमुक्त पिढी घडवावी : रामदास फुटाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:07 AM