नाशिक : एका दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या कुरापत काढून दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन गटांत बेदम मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.६) तिडके कॉलनीतील मिलिंदनगर येथे घडला असून, याप्रकरणी दोन्ही गटांकडून मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिडके कॉलनीतील मिलिंदनगर येथील बाबासाहेब मुंडे यांनी एका गटाकडून तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याच्या कारणातून संशयित आरोपी जालिंदर गिडगे, भारत हलवार, विठाबाई हलवार, संगीता हलवार (रा. सर्व मिलिंदनगर) यांनी मुंडे यांच्या घरी येऊन कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडे यांनी मुंडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली, तर दुसऱ्या गटाकडून जालिंदर गिडगे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शैलेश मुंडे, बाबासाहेब मुंडे, प्रकाश मुंडे, नंदाबाई मुंडे या सर्वांनी बुधवारी झालेल्या भांडणाची पुन्हा कुरापत काढून लाकडी दांडे तसेच लोखंडी रॉडने त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, सहायक उपनिरीक्षक कैलास ठाकूर व हवालदार आर. व्ही. सोनार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन गटांत जबर हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:36 PM
जुन्या भांडणाची कुरापत काढून दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन गटांत बेदम मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.६) तिडके कॉलनीतील मिलिंदनगर येथे घडला असून, याप्रकरणी दोन्ही गटांकडून मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
ठळक मुद्देतिडके कॉलनीत दोन गटांत हाणामारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने भांडणाची कुरापत मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा