शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

आंदोलनाला हिंसक वळण

By admin | Published: June 06, 2017 2:24 AM

सटाणा : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याला बागलाण तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात शंभर टक्के कडकडीत बंद पाळून प्रतिसाद देण्यात आला. सटाणा शहरात मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर लखमापूर, जुनी शेमळी व धांद्री येथे सटाणा-मालेगाव मार्ग अडवून दीड तास चक्का जाम केला. धांद्री येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला प्रवेशद्वारावर फाशी देण्यात आली. लखमापूर येथे शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केल्यामुळे सटाणा-मालेगाव रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.गेल्या चार दिवसांत ठिकठिकाणी झालेले रास्ता रोको आंदोलन व आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्यामुळे संपाची तीव्रता वाढत आहे. मांगीतुंगी फाटा, सोमपूर, आसखेडा, नामपूर, मुंगसे, वीरगाव येथे भाजीपाला वाहतुकीचे मालट्रक अडवून तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. दरम्यान, सोमवारी (दि. ५) राष्ट्रवादी कॉँग्रेससह काही शेतकरी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला बागलाण तालुक्यातील नामपूर, द्याने, उत्राणे, आसखेडा, जायखेडा, सोमपूर, ताहाराबाद, मुल्हेर, डांगसौंदाणे, करंजाड, निताणे, वीरगाव, कंधाणे, चौंधाणे, मुंजवाड, आराई, मोरेनगर, अजमीर सौंदाणे, वायगाव, लखमापूर, ब्राह्मणगाव, धांद्री, जुनी शेमळी आदी ठिकाणी शंभर टक्के प्रतिसाद लाभला. सटाणा शहरात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच बाजारपेठ काही प्रमाणात सुरू होत्या, तर प्रवासी वाहतूकदेखील सुरळीत होती. सटाणा बाजार समितीतही सोमवारी व्यवहार बंद ठेवल्याने आवारात शुकशुकाट होता. साठफुटी रोडवरील डेली भाजीपाला मार्केट व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहर व परिसरात बंदोबस्तात वाढ केली होती. बंद काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बशीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी विशेष गस्ती पथके तयार केली असून, ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.