नाशिक : मुंबईच्या काही गुन्हेगारांच्या मदतीने नाशकातील काही गुन्हेगार एअरटेल कंपनीचे व्हीआयपी नंबर विशिष्ट रकमेत देण्याचे आमिष दाखवून देशभरातील नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले असून, अशाप्रकारे करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांनी देशभरातून सुमारे एक कोटी सहा लाख रुपयांची लूट केल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि. २) पत्रकार परिषदेत सांगितले.पोलिस आयुक्तांना त्यांच्या सूत्रांक डून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना नाशिककरांच्या बनावट कागदपत्र वापरून बोगस बँक खाते उघडत देशभरातील नागरिकांना गंडविणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना अभिनेता बिंदू दारासिंह यांच्या हैदराबादमधील मित्राची नाशिकमधून व्हीआयपी मोबाइल नंबरचे आमिष दाखवून साडेचार लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे नाशिक पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरविली. नाशिकमधून ज्या बँके च्या खात्यावरून पैसे काढण्यात आले तेथील सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्णातील नाशिकचा सूत्रधार शरद पंडित पगार व मालेगाव येथील पाडळदेचा पंकज तुकाराम निकम याच्यासह मुंबईतील ठाण्याच्या मीरारोड येथील नाजेश इस्मत झवेरी (२३), डोंबिवलीतील पलाभी सीटी येथील जेन तसनीन खान (२३) व पुण्यातील भोसरीच्या मोशी, आदर्शनगर येथील अंकुश सुभाष लोळगे अशा पाच जणांना अटक केल्याचे नांगरे-पाटील यांनीसांगितले.या प्रकरणातील आरोपी जस्ट डायलच्या माध्यमातून एअरटेल कंपनीचे व वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल वापरत असलेल्या लोकांना व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करणारे मेसेज पाठवत होते. त्यांच्या जाळ्यात अडकून त्यांच्याशी संपर्क साधून व्हीआयपी मोबाइल नंबरची मागणी करणाºयांना आरोपींकडून मोठ्या रकमेच्या बदल्यात नंबर देण्याचे आमिष दाखवून या रकमा बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडलेल्या खात्यांवर ट्रान्स्फर करण्यासाठी सांगितले जात. जाळ्यात अडकलेल्या नागरिकांकडून खात्यावर रक्कम जमा होताच आरोपी त्यांचे फोन स्वीकारणे बंद करीत खात्यावर जमा झालेली रक्कम काढून आपसात वाटून घेत असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे लोकांची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी नाशिकमधील विविध नामांकित बँकांमध्ये १७ खाते उघडले असल्याचे आतापर्यंत समोर आल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीफसवणूक प्रकरणातील आरोपींवर यापूर्वीही दुचाकीचोरी, बीटक ॉइन, फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल असून, या गुन्ह्णाचा सूत्रधार शरद पगार आणि नाजेश जवेरी यांनी नाशिकमधील तुरुंगात या गुन्ह्णाचा कट रचल्याचे समोर आले आहे. यातील शरद पगार याच्यावर सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाण्यात कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे व विविध प्रकारचे १२ गुन्हे दाखल असून, अंकुश लोळगे याच्यावर लासलगाव येथे दरोड्याचा, पंकज निकमवर दुचाकीचोरीचे तर नाजेश झवेरी याच्यावर बीटकॉइन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.शिक्के तयार करण्याचे यंत्र जप्तलोकांची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी बनावट रबरी शिक्के वापरले असून, हे शिक्के तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया मशीनसोबतच बनावट शाळा सोडल्याचे दाखले, आधारकार्ड, भाडे करारनामे, तसेच फसवणूक झालेल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरण्याच आलेले १३ मोबाइल, एक लॅपटॉप, बनावट रबरी स्टॅम्प असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.देशभरातील नागरिकांची लूटपोलिसांनी केलेल्या तपासात आतापर्यंत आरोपींनी हैदराबाद, मुंबई, मध्य प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली, परळी, उत्तर प्रदेश आदी विविध ठिकाणांहून १ कोटी ६ लाख ५३ हजार ८७२ रुपयांची रक्कम बनावट खात्यांवर ट्रान्स्फर करण्याची मागणी करून काढून घेतल्याचे समोर आले असून आणखी काही फसणुकीची प्रकरणे उघड होण्याची शक्यता असून, फसवणुकीचा आकडाही वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
व्हीआयपी मोबाइल नंबरचे आमिष; फसवणूक करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:57 AM
मुंबईच्या काही गुन्हेगारांच्या मदतीने नाशकातील काही गुन्हेगार एअरटेल कंपनीचे व्हीआयपी नंबर विशिष्ट रकमेत देण्याचे आमिष दाखवून देशभरातील नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले असून, अशाप्रकारे करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : देशभरात एक कोटी सहा लाखांची लूट