लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (जि. पुणे) येथील चिंतामणी मंदिरातील १०० रुपये भरून व्हीआयपी दर्शन घेण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय चिंतामणी ट्रस्टने घेतला आहे.
नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांनी व्हीआयपी दर्शनाबाबत कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर ट्रस्टने तातडीची बैठक घेतली आणि व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. चिंतामणी ट्रस्टचे वकील मनोज वाडेकर यांनी यासंदर्भात दळवी यांचे वकील मनोज पिंगळे यांना पत्र दिले आहे.
राज्यात त्र्यंबकेश्वर, वणी, शिर्डीपासून अनेक ठिकाणी सशुल्क दर्शन दिले जाते. राज्यघटनेच्या समतेच्या तत्त्वाच्या विरोधात ही कृती आहे. त्यामुळे या देवस्थानांनी देखील सशुल्क दर्शनाबाबत फेरविचार करावा. - कैलास दळवी, भाविक
सशुल्क दर्शन हे राज्यघटनेशी विसंगतnनाशिकमधील निर्भय फाऊंडेशनचे सदस्य माजी सरपंच कैलास दळवी हे गेल्या १ जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने अष्टविनायक दर्शनासाठी गेले.nमंदिरात शंभर रुपयांत सशुल्क दर्शन म्हणजेच व्हीआयपी दर्शनाचा फलक त्यांनी बघितला. दळवी यांनी त्यास आक्षेप घेतला. त्यांनी ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत चिंचवड देवस्थानास नोटीस बजावली. पैशाच्या आधारे भेदभाव करणे हे राज्यघटनेशी विसंगत असल्याचे नोटिसीत म्हटले होते.