घोटी : आदिवासी आश्रमशाळेतील मुलींचे संशयास्पद मृत्यू, लैंगिक छेडछाडीच्या वाढलेल्या घटना व स्थानिक वसतिगृहातील मागण्यां-बाबत शनिवारी आदिवासी बांधवांनी घोटी शहरात मोर्चा काढून शासनाच्या निषेधाचे निवेदन तहसीलदार व घोटी पोलिसांना दिले.मोर्चाचे नेतृत्व नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे यांनी केले. या मोर्चात नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनसह विद्रोही संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी विचार प्रतिष्ठान या संघटनेचे जवळपास ८०० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई - आग्रा महामार्गावरील सिन्नर फाटा येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. घोटी शहरातील भंडारदरा नाका, जुना मुंबई - आग्रा मार्गाने घोटी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. घोटी पोलीस ठाण्यात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या विनयभंगाचा प्रकार संस्थाचालकामार्फत घडला आहे, डहाणू प्रकल्पातील श्रद्धा गवळी हिचा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे बळी गेला आहे. अक्कलकुवा येथील जागृती पावरा या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू आदी घटनांचा निषेध करून, दोषींवर पोस्को आणि अॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल पुरे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष मारुती वायळ, डॉ. जालिंदर घिगे, रवींद्र तळपे, काशीनाथ कोरडे यांनी सभेला संबोधित करून आदिवासी बांधवांचे प्रश्न मांडले. या मोर्चात नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे, मारुती वायळ, सोमनाथ जोशी, तुकाराम वारघडे, स्वप्नील धांडे, साहेबराव बांबळे, उद्धव रोंगटे, आदिवासी विकास परिषदेचे संतोष रौंदळ, सोमनाथ घारे आदी उपस्थित होते.
घोटीत आदिवासींचा विराट मोर्चा एकजूट : तहसीलदारांना विविध मागण्यांचे दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:10 AM
घोटी : आदिवासी आश्रमशाळेतील मुलींचे संशयास्पद मृत्यू, लैंगिक छेडछाडीच्या वाढलेल्या घटना व स्थानिक वसतिगृहातील मागण्यां-बाबत निषेधाचे निवेदन पोलिसांना दिले.
ठळक मुद्देसिन्नर फाटा येथून मोर्चाला सुरुवातविद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू