नाशिक : विवाह सोहळ्याच्या उपस्थितीबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशांमध्ये स्पष्टटा नसल्यामुळे मंगल कयार्लय संचालक आणि नागरीकांमध्येही संभ्रमावस्था निमार्ण झाली असून यामुळे विवाह सोहळ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. दरम्यान मंगल कायालर्यांनी विवाह मोजक्या व?्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांच्या आॅर्डर स्विकारण्यास सुरुवात केली असून हळदीसाठी मुक्कामी राहाण्याची परवानगी मात्र नाकारली जात आहे.मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाउन सुरु असल्यामुळे ऐन हंगामात मंगल कायार्लयत बंद ठेवावी लागली. अनलॉक प्रक्रीयेनंतर मोजक्या व?्हाडींच्या उपस्तथतीत विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आली असली तरी याबाबत केंद्र आणि राज्य शासनाचे वेगवेगळे आदेश असल्याने उपस्थितांच्या संख्येबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. केंद्राने मंगल कायालर्यांच्या क्षमतेपेक्षा अध्या र्संख्येला परवानगी दिली असल्याचे सांगितले जात असले तरी महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पहाता राज्य शासनाने मात्र अद्याप ५० व?्हाडींच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. मंगल कायालर्यांकडून सध्या राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात असून मोजक्यात उपिस्थतीमध्ये होणा?्या विवाहांसाठी कायार्लय उपलब्ध करुन दिले जात आहे. पुवी हळदी समारंभासाठी एक दिवस अगोदर कायार्लय उपलब्ध करुन दिले जात होते. आता कायालर्यावर मुक्कामी राहाता येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले जात असून ज्यांना हळदी समारंभ करावयाचा आहे त्यांनी विवाह सोहळ्याच्या दिवशीच तो करावा असा सूचना कायालर्याकडून दिल्या जात आहेत. कोरोनाच्या या संकटामुळे विवाह सोहळ्यांच्या आनंदावर विरजन पडले असून अगदी कमीत कमीत उपस्थितांमध्ये विवाह सोहळा उरकण्याकडे कल वाढु लागला आहे. मंगल कायालर्यांना याचा मोठा आथिर्क फटका सहन करावा लागत असून आधीच एप्रिल मे चा हंगाम वाया गेल्याने त्यांच्यावर आथिक संकट कोसळले आहे.महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शासनाने केवळ ५० लोकांच्या उपस्थतीला परवानगी दिली आहे. आपली काळजी आपणच घ्यायला हवी यासाठी मुक्कामी रहाण्याची आम्ही परवानगी देत नाही. या महिन्यात लग्न मुहुर्त आहेत. मोजक्या उपस्थितांच्या विवाह सोहळ्यांचे नियोजन केले जाते. - अमित कमळे, मंगल कायारलय संचालकउपस्थितांची लक्षात घेउन मंगल कायालर्यांनी संपूर्ण पॅकेज बदलले आहेत. सर्व कार्यक्रम एकाच दिवशी उरकले जात असून मुक्कामी रहाण्याची परवानगी दिली जात नाही. जर कणी अधिक उपस्थितांचा आग्रह धरला तर त्यांनी स्वत: तशी परवानगी काढावी असे सूचविले जाते. - हर्षल पवार, मंगल कायार्लय संचालकलॉकडाऊनमुळे वर्षभरापासून व्यवसाय बंद आहे. यामुळे मंडप, केटरींग या व्यवसायातील कामगार बेरोजगार झाले आहेत. संपूर्ण व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. जेथे १५०० उपस्थतीत विवाह सोहळे होत होते तेथे आज ५० लोकांच्या उपस्थतीत समारंभ होत असल्याने याचा मोठा फटका बसला आहे. - सुशांत अवसरे, मंगल कायार्लय संचालक