इन्फो
गिरणा धरण ६६ टक्क्यांवर
उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जलसाठा असलेले गिरणा धरण ६६ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून गिरणा धरण ओळखले जाते. १८ हजार ५०० दशलक्ष घनफुट म्हणजेच साडे १८ टीएमसी एवढी या धरणाची पाणी साठवणक्षमता आहे. गतवर्षी हे धरण १०० टक्के भरले होते. गेल्या दोन वर्षांपासून गिरणा धरणात लक्षणीय पाणीसाठा वाढत आहे. यंदा गतवर्षाच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा नसला तरी धरण ६६ टक्के भरल्याने मालेगावसह खान्देशातील जळगाव जिल्हावासीयांची पाण्याची चिंता काही अंशी मिटली आहे. आत्तापर्यंत हे धरण दहावेळा पूर्णक्षमतेने भरले आहे. याआधी सन १९७३, १९७६, १९८०, १९९४, २००४, २००५, २००६, २००७ आणि २०१९ यावर्षी १०० टक्के भरले होते.