शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

‘व्हिझिट महाराष्ट्र’च्या धर्तीवर ‘व्हिझिट नाशिक’

By admin | Published: August 27, 2016 11:22 PM

जयकुमार रावल : वॉटरस्पोर्ट्स, वायनरी हबसाठी विशेष निधी

 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासह अन्य धार्मिक ठिकाणे तसेच प्रेक्षणीय स्थळांचा खजिनाच असलेल्या नाशिक जिल्ह्यात लवकरच राज्य सरकारच्या ‘व्हिझिट महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ‘व्हिझिट नाशिक’चा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे धोरण ठरविले आहे. त्यामुळेच पर्यटन विभागाला स्वतंत्र मंत्री देऊन महाराष्ट्रातील पर्यटन वाढविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी २०१७ हे वर्ष ‘व्हिझिट महाराष्ट्र’ म्हणून साजरे केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने खूपच पोषक वातावरण आहे. म्हणून व्हिझिट महाराष्ट्राच्या धर्तीवर नाशिककडे पर्यटक आकर्षित होण्यासाठी ‘व्हिझिट नाशिक’ची संकल्पना लवकरच राबविण्यात येईल. अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने महाराष्ट्र सरकारनेही पर्यटनाकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक तो निधीही पर्यटनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नाशिकला गड-किल्ले, धरणे, वायनरी, शिर्डी, शनि-शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंग गड यांसारखी धार्मिक स्थळे, तसेच नांदूरमध्यमेश्वर सारखी पक्षी अभयारण्ये, वायनरी प्रकल्प असे पर्यटनाच्या दृष्टीने एक ना अनेक गोष्टी आहेत. नाशिक जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहणार आहेत. गंगापूर डॅमवरील बोटक्लब सुरू करण्याबरोबरच नाशिकमधून वॉटरस्पोर्ट व सी-प्लेन सेवा सुरू करण्याचे प्रयत्न राहणार आहे. दिल्ली हाटबाजाराच्या धर्तीवर नाशिकच्या गोवर्धन येथे कलाग्राम केंद्र सुरू करण्यात येईल. नाशिकची विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सरकार मदत करणार आहे. धार्मिकस्थळांना विमानसेवेद्वारे भेटी देणाऱ्या पर्यटकांना २५०० रुपयांत हवाई सफर घडविण्यात येईल. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आयुक्त एकनाथ डवले, पर्यटन महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, लक्ष्मण सावजी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)