नाशिकरोड : राष्टÑपुरुषांच्या जीवन कार्याच्या माहितीसह विविध विषयांवरील पुस्तके परिसरांतील शाळा, महाविद्यालय व वाचनालयात राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने भेट देण्यात आली.विद्यार्थ्यांना व नागरिकांना राष्टÑपुरुषांच्या जीवन कार्याची माहिती व्हावी. तसेच सामाजिक, न्याय, समता, बंधुत्व आदी विविध विषयांवरील पुस्तके युवा कृती समितीचे संस्थापक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक वाघ यांनी उपलब्ध करून दिले. देवळालीगाव कामगार कल्याण केंद्र, सोमवार पेठ मनपा शाळा क्रमांक ६०, मनपा शाळा ६१, वडनेर दुमाला मनपा शाळा, आठवडे बाजार मनपा शाळा, विहितगाव न्यू इंग्लिश स्कूल, तक्षशिला विद्यालय, चेहेडी पंपिंग, आदर्श विद्यामंदिर, के. जे. मेहता हायस्कूल, बिटको महाविद्यालय आदी शाळांमध्ये व वाचनालयात राकॉँचे शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे व नाशिकरोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, मंगेश लांडगे, चंदू साडे, विक्रम कोठूळे, संजय पोरजे, निवृत्ती महाराज कापसे, रमेश औटे, बाळासाहेब मते, दौलत त्रिभुवन, चैतन्य देशमुख आदींच्या हस्ते राष्टÑपुरुषांच्या जीवन कार्याची माहिती देणारे व इतर विविध विषयांवरील पुस्तके भेट देण्यात आली.
राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे शाळांना पुस्तके भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:56 PM