खामखेडा : परिषदेच्या शाळा ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हाव्या म्हणून लोकसहभागातून सौरऊर्जा वापराचा प्रयत्न फांगदर शाळेने लायन्स क्लब आॅफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपच्या माध्यमातुन केला आहे. सौरउर्जेवर स्वयंप्रकाशित होण्याचा मान या शाळेने मिळविला आहे. फांगदर शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम पहात व प्रतिकुल परिस्थिती शाळा विद्यार्थ्यांसाठी देत असलेले योगदान व डिजीटल झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत कायमस्वरूपी विजेची व्यवस्था रहावी यासाठी शाळेने सौरऊर्जा प्रकल्पासाठी लोक सहभागाचे आवाहन केल्यानंतर लायन्स क्लब आॅफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपने १ लाख २९ हजारची सौर उर्जा कीट शाळेला पुरविले आहे. या मदतीने जिल्हा परिषदेची फांगदर हि डिजिटल शाळा आता जिल्ह्यातील दुसरीच सौरशाळा झाली आहे. लायन्स क्लब आॅफ नाशिक सेंट्रलचे अध्यक्ष महेश पितृभक्त, सचिव दत्तात्रेय शिनकर, कोषाध्यक्ष अमोल सोनजे, भूषण कोठावदे, विनोद सोनजे, विनोद कोठावदे, किशोर शिरुडे, रवींद्र सोनजे, हर्षद चिंचोरे, सचिन वाघमारे, अभिजित पाचपुते, राहुल अमृतकर, श्रीकांत अमृतकर, हितेश देव, आदि युवकांनी यासाठी पुढाकार घेतला.शालेय वेळेत विजवापरया शाळेला सौर पॅनेल बसवले गेले असून हि उर्जा बॅटरीत साठवुन शालेय वेळेत विज वापरता येत आहे. यामुळे शाळेत असलेले चार संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर, स्मार्ट बोर्ड, इम्प्लीफायर, साउंड या यंत्रणेवर शालेय वेळेत सतत चालणार आहे.
फांगदर शाळेला सौरऊर्जा संच भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:21 AM