सिन्नर : शासनाकडून कांद्याला हमीभाव, कर्जमुक्तीची मागणीसिन्नर : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कांद्याला हमीभाव मिळण्यासह शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या मागणीच्या निवेदनाबरोबर तहसीलदारांना थेट कांदेच भेट देण्यात आले.मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांची भेट घेऊन निवेदनाबरोबर कांदेही सुपूर्द केले. मागील ५-६ वर्षांपासून सातत्याने असलेल्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी होरपळून निघाला आहे. दुष्काळामुळे पीक नसल्याने पैसा नाही. हातउसने व कर्ज काढून कांदा लागवड केल्यानंतर निसर्गाच्या अवकृपेमुळे पाच ट्रॅक्टर कांदे निघणाऱ्या शेतात एकच ट्रॅक्टर कांद्याचे उत्पन्न झाले. त्यातच बाजारभावाने घात केल्याचे निवेदनात म्हटले आहे. कांद्याला हमीभाव व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी अशोक पवार, तुषार कपोते, संतोष लोंढे, तेजस बोंबले, विलास सांगळे, कैलास सहाणे, संतोष गांजवे, कैलास तांबे, काकासाहेब तांबे, गणेश मूत्रक, लखन खर्डे, वेदांत मूत्रक, गोपी सोळंकी, एकनाथ दिघे, कैलास दातीर, मंगेश ढगे, प्रकाश नवाळे, योगेश शिंदे, सचिन उगले, शुभम सिरसाट, रोशन सिरसाट, सुनील जाधव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
मनसेकडून तहसीलदारांना कांदा भेट
By admin | Published: May 10, 2016 10:25 PM