शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

काठी भेट : ८० हजार भाविकांनी घेतले दर्शन म्हाळोबा यात्रेत नवसपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:13 AM

नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत असलेल्या व दोडी परिसराचे ग्रामदैवत म्हाळोबा महाराज यात्रेच्या दुसºया दिवशी मंगळवारी नवसपूर्तीसाठी सुमारे तीन हजारांहून अधिक बोकडांचा बळी देण्यात आला.

ठळक मुद्देभक्तगणांच्या हस्ते म्हाळोबाची महापूजापोलीस कर्मचारी तैनात

नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत असलेल्या व दोडी परिसराचे ग्रामदैवत म्हाळोबा महाराज यात्रेच्या दुसºया दिवशी मंगळवारी नवसपूर्तीसाठी सुमारे तीन हजारांहून अधिक बोकडांचा बळी देण्यात आला. दिवसभरात सुमारे ८० हजार भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. दरवर्षी माघ पौर्णिमेस म्हाळोबा महाराजांची यात्रा भरते.आज यात्रेच्या दुसºया दिवशी पहाटे भक्तगणांच्या हस्ते म्हाळोबाची महापूजा करण्यात आली.. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची गर्दी मोठी गर्दी होती. मंदिराच्या शंभर फूट चारही बाजूंनी बॅरिकेड्स उभारून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. नवसपूर्तीसाठी भाविकांकडून बोकळबळी दिल्यानंतर भाविक व मित्र परिवार भोजनाचा आस्वाद घेताना दिसत होते. महिलांकडून नवसपूर्तीसाठी दिवसभर लोटांगण घेणे, दंडवत घालणे आदी कार्यक्रम सुरू होते. काही भाविक नवसपूर्तीसाठी गूळ- पेढे तसेच देवाला पुरणपोळीचा नैवेद्य देत होते. गाभाºयात गर्दी होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात्रेसाठी खान्देश भागासह नाशिक, संगमनेर, नगर, श्रीरामपूर, निफाड, नांदगाव, सटाणा, देवळा, सांगवी, तळेगाव आदी भागातून धनगर समाजाचे भाविक पिकअप, ट्रॅक्टर, टेम्पो, जीप, रिक्षा आदी वाहनांतून यात्रास्थळी दाखल झाले होते. दुपारी भक्तमंडळींनी म्हाळोबा मंदिराच्या पूर्वेला ‘पाऊलटेकडी’ येथे तळेगाव येथील भागवत कांदळकर, प्रभाकर कांदळकर, दशरथ कांदळकर, भीका कांदळकर यांच्या मानाच्या काठीच्या भेटीनंतर जिल्हाभरातून आलेल्या मानाच्या काठ्यांची भेट घडविण्यात आली. ही काठ्यांची गुरशिष्य भेट म्हणून गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा सुरू आहे. यावेळी दोडी बुद्रुक येथील भक्तगण ढोल, सनई, ललकारी, धनगरी गजनृत्य सादर करीत पाऊलटेकडीकडे गेले. यावेळी गगनचुंबी काठीमहाल घेऊन देवभेट घडवली.त्यानंतर सायंकाळी देवाजवळ ‘तकट’ सोडण्यात आला. राज्यातील विविध भागातून धनगर समाजाच्या सुमारे १०० देवकाठ्या येथे आल्या आहेत. यानंतर लंगर तोडून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. धनगरी नृत्य बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. रात्रभर डफाच्या तालावर धनगर समाजाचे भाविक व्हयकं म्हटले व भाविकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. रात्री म्हाळोबा-बिरोबा देवाचे सुमरान मंडल म्हणून वाण ओवी गीते म्हटली गेली. त्यानंतर भक्तगणांनी गजनृत्य सादर केले. राज्यातील धनगर समाजासह अन्य समाजाचे भाविक नवसपूर्ती करतात. मंगळवारी दिवसभरात सुमारे ८० हजार भाविकांनी हजेरी लावली. बुधवारी यात्रेत स्थानिक भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावण्याची शक्यता आहे. यात्रेकरुंसाठी मोठ्या प्रमाणात पटांगण, वाहनतळ व्यवस्था करण्यात आली होती. वावी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्यासह तीन उपनिरीक्षक व ५० कर्मचारी तैनात होते. यावर्षी स्वयंसेवकांनी पोलिसांना चांगली मदत केली. दोडी ग्रामीण रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली पाच कर्मचारी, रुग्णवाहिका भाविकांच्या सेवेसाठी घटनास्थळी हजर होते. बुधवारी (दि. ३१) दुपारी ४ वाजता येथे कुस्त्यांची दंगल होणार आहे. कुस्त्यांसाठी १०१ पासून २१०१ रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. यात्रा शांततेत व उत्साहात साजरी करण्यासाठी यात्रा समिती व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.भाविकांचे हालदोडी येथील म्हाळोबा महाराज यात्रोत्सवासाठी भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यात येत होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सदर आवर्तन सुटत नाही. यावर्षी धरणात पाणी असल्याने आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, आवर्तन न सुटण्याने भाविकांची गैरसोय झाली. यामुळे यात्रा समितीने नाराजी व्यक्त केली.