शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

अधिकाऱ्यास कचºयाची फोटोफ्रेम भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:41 AM

संपूर्ण पंचवटी विभागात घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले असले तरी मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने पंचवटी प्रभाग समिती बैठकीत आरोग्य विभागाला कचºयाची आणि बांधकाम विभागाला खड्ड्यांचे छायाचित्र असलेली फोटोफ्रेम भेट देत उपरोधिक आंदोलन केले.

पंचवटी : संपूर्ण पंचवटी विभागात घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले असले तरी मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने पंचवटी प्रभाग समिती बैठकीत आरोग्य विभागाला कचºयाची आणि बांधकाम विभागाला खड्ड्यांचे छायाचित्र असलेली फोटोफ्रेम भेट देत उपरोधिक आंदोलन केले.प्रभागाची बैठक शुक्रवारी (दि.१५) सभापती सुनीता पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठक सुरू होताच अवघ्या दोन विषयांच्या दहा लाख रुपयांच्या कामांना विनाचर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभीच प्रभागात घंटागाडी नियमित येत नसल्याने तसेच रस्त्यावरचे खड्डे बुजविले नसल्याने नगरसेवक पूनम मोगरे यांनी आरोग्य आणि बांधकाम विभागाला प्रभागातील सद्य परिस्थितीचे फोटो काढून तयार केलेली फोटोफ्रेम भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून प्रभागात कचरा पडून असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे मात्र तरीदेखील प्रशासन घंटागाडी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप मोगरे यांनी यावेळी केला.पंचवटी विभागात पालापाचोळा जमा करण्यासाठी केवळ एकच गाडी असल्याची तक्रार कमलेश बोडके यांनी करून आतापर्यंत घंटागाडी ठेकेदाराला किती दंड केला तसेच काय कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली, तर आडगाव परिसरातील समस्यांबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल शीतल माळोदे यांनी व्यक्त केला. यावेळी बैठकीत नगरसेवक प्रियंका माने, सारिका सोनवणे, पूनम सोनवणे, अनिल वाघ व महेंद्र आव्हाड, आर. एस. पाटील, वसंत ढुमसे, संजय कानडे, अनिल गायकवाड सहभागी झाले होते.तुम्हीच सांगा कुठे जायचे आम्ही...बैठकीत एका लोकप्रतिनिधीने प्रभागातील समस्यांबाबत तक्रार करून दखल घेतली जात नसल्याचे सांगताच अधिकाºयाने एका नगरसेवकाचा मुलगा मनपात बोलवितो तर दुसरा घटनास्थळी बोलवितो. माझ्याकडे दोन विभागांचा अतिरिक्त पदभार आहे काम कसे करायचे, मग तुम्हीच सांगा कुठे जायचे आम्ही आणि काय काय करायचे असे सांगून तुम्ही मला कामाच्या तक्रारींचा कधी फोन केला दाखवून द्या असे सांगत आपली बाजू मांडली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक