गुळवंच : पुणे येथील डोअर-स्टेप संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांची प्रगती, ग्रामस्थांचे सहकार्य व शिक्षकांची शाळेबद्दलची आत्मीयता याबाबतची माहिती जाणून घेतानाच या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या शैक्षणिक दर्जावाढीचे गमक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.पुणे येथील डोअर-स्टेप स्कूलच्या समुपदेशक स्मिता जोशी, सहायक संचालक राजश्री जाधव, संगीता हुमावळे, योगिनी रानडे, दीपाली अवसरे, सुजाता दगडे, सुनीता ठेणे, स्वाती धोकटे यांनी येथील प्राथमिक शाळेला भेट दिली. शालेय व्यवस्थापन समितीची कामे, समिती पदाधिकाऱ्यांचे शाळेसाठीचे योगदान, शिक्षकांचे शैक्षणिक काम याबाबत माहिती जाणून घेत चर्चा केली. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळा उत्तम प्रगती व त्याचबरोबर गुणवत्ता टिकविण्यात यशस्वी होत असल्याचे मत त्यांनी गुळवंच शाळेची पाहणी केल्यानंतर व्यक्त केले. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता तपासली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग सानप, भगवान सानप, पोलीसपाटील संदीप सानप, ग्रामपंचायत सदस्य संतोष कांगणे, भरत सानप, भाऊसाहेब सानप, रेखा झणकर, हरीश वैद्य, मुख्याध्यापक संदीप सानप, राजेंद्र पाटील, राजेश सांगळे, श्रीधर गीत, रामदास घुगे, मनीषा उगले यांनी चर्चेत सहभाग घेतला. (वार्ताहर)
पुण्याच्या संस्था पदाधिकाऱ्यांची शाळेला भेट
By admin | Published: November 29, 2015 11:17 PM