साकोरा : येथे गेल्या आठवड्यात खोदकामात सापडलेल्या भगवान आदिनाथ यांच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी नाशिक येथील पुरातत्व विभागाने बुधवारी दुपारी भेट दिली असता, संबंधित विषयावर संशोधन करून आठ दिवसांत मूर्ती पुरातन की नविन याबाबत खुलासा करणार असल्याचे सांगितले.सदर मूर्तीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक येत आहेत. त्यानंतर अंनिस समितीने देखिल या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व चमत्कार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यानंतर बुधवारी दुपारी पुरातत्व विभागाच्या अभिरक्षक प्रादेशिक वस्तूसंग्रालय नाशिकच्या जया वहाणे यांनी भेट देऊन मुर्तींची पाहणी केली. सचिन पगारे यांनी सदर मुर्तींचे सर्व बाजूने फोटो घेतले. यासंदर्भात गावकऱ्यांशी चर्चा करून आठ दिवसांत मुर्ती गावात ठेवायची की नाही याबाबत नांदगावचे तहसिलदार यांच्याकडे माहिती दिली जाईल असे सांगितले. त्यानंतर सदर मुर्ती साकोरा येथेच असू द्यावी, अशा प्रकारचे दोन निवेदन ग्रामपंचायत व जैन बांधवातर्फ यावेळी पुरातत्व विभागाच्या जया वाहणे यांना देण्यात आले.यावेळी ग्रामस्थ व नांदगाव येथिल जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरातत्व विभागाची साकोरा येथे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:23 AM
साकोरा : येथे गेल्या आठवड्यात खोदकामात सापडलेल्या भगवान आदिनाथ यांच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी नाशिक येथील पुरातत्व विभागाने बुधवारी दुपारी भेट दिली असता, संबंधित विषयावर संशोधन करून आठ दिवसांत मूर्ती पुरातन की नविन याबाबत खुलासा करणार असल्याचे सांगितले.
ठळक मुद्देमूर्तीसंदर्भात दहा दिवसांत खुलासा करणार; जैन बांधवांतर्फे निवेदन