मालेगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग व्यवसाय आहे. वस्त्रोद्योगाचे माहेरघर आहे. या व्यवसायाला उभारी देण्यासाठी व विणकरांच्या भल्यासाठी केंद्र शासनाने मेगा पॉवरलूम क्लस्टर योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहरालगतच्या सायने औद्योगिक वसाहतीला व शेती महामंडळाच्या जमिनीवर असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या जमिनीची खोडे यांनी पाहणी केली तसेच सायने परिसरातील काही पॉवरलूम क्लस्टरला भेट देवून पाहणी केली. येथील शासकीय विश्रामगृहावर क्लस्टरधारकांकडून व स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी मुंबईचे वस्त्रोद्योग प्रादेशिक उपसंचालक एस. एम. तांबे, वस्त्रनिर्माण निरीक्षक जी. यु. पाथरे, सहाय्यक संचालक विजय रणपिसे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांत अधिकारी अजय मोरे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, सहाय्यक उपायुक्त राजू खैरनार, तहसीलदार ज्योती देवरे आदि उपस्थित होते.
वस्त्रोद्योग संचालकांची मालेगावी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 8:45 PM