दाभाडी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा २०१७-१८ साठी तालुकास्तरीय मूल्यमापन करण्यासाठी दिंडोरी गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील, विस्तार अधिकारी ए. के. गोपाळ, पी. बी. खंबाईत, वाय. एन. गोवर्धने, डी. एस. पालखेडे यांनी तालुक्यातील दसाने गावाला भेट दिली. यावेळी गावातील परिसरसह शाळेला भेट देण्यात आली. यावेळी सरपंच अर्चना पवार, उपसरपंच अनिल आहिरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पवार, समाधान ठाकरे, केवळ आहिरे, कृष्णा सोनवणे, लहू अण्णा पवार, संभाजी शेवाळे, आप्पा वानखेडे, राहुल पवार, त्र्यंबक देसले, ग्रामसेवक बी. डी. पगार, मुख्याध्यापक सुधाकर पवार, युवराज वाघ, आरोग्य कर्मचारी डी. बी. शेवाळे, पी. एस. बोरसे, अंगणवाडी सेविका सीमा पवार, वंदना पवार, अरुणा जाधव, हिराबाई पवार, लहू वाघ, विलास सोनवणे आदी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा कमिटीची दसाणेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:00 PM