नाशिक : तबलावादनाची जुगलबंदी, कथक नृत्यशैलीचे सादरीकरण आणि कानडा राजा पंढरीचा या अभंगाने ‘स्वरांकुर’ या शास्त्रीय संगीत मैफलीतून विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्काराचे दर्शन घडवून रसिकांची मने जिंकली.भारतीय संस्कृतीतील शास्त्रीय संगीताचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताची आवड रुजावी या उद्देशाने इस्पॅलियर हेरिटेज स्कूलतर्फे ‘स्वरांकुर’ शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तबलावादक नितीन वारे, शाळेचे प्रमुख सचिन जोशी उपस्थित होते.यावेळी बोलताना नितीन वारे यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची नव्या पिढीला माहिती व्हावी तसेच संगीताची आवड जोपासली जावी, यासाठी अशा सांगीतिक कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वरांकुर’ या कार्यक्रमात कलाविष्कार सादर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी कार्यक्रमास गायन, वादन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांकडून ‘स्वरांकुर’ कलाविष्काराचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:49 PM