याबाबत मिळालेली माहिती अशी की, विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी अशोक रामचंद्र आहेर यांची झिरेपिंपळ शिवारात शेतजमीन आहे. मळ्यातील शेडमध्ये उभा असलेला महिंद्रा जिओ कंपनीचा सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा एक वर्षापूर्वी खरेदी केलेला छोटा ट्रॅक्टर सायंकाळी चोरट्यांनी पिकअप वाहनात टाकून हातोहात लांबविला. सायंकाळी हा प्रकार आहेर कुटुंबीयांच्या लक्षात आला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात योगेश अशोक आहेर यांनी तक्रार दाखल केली. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लोहोणेर - विठेवाडी परिसरातून दुचाकी चोरीचे सत्र वाढले असून, चोरट्यांनी चक्क ट्रॅक्टरच पळविला असल्याने शेतकरीवर्ग व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.
फोटो - १८विठेवाडी
विठेवाडी येथील शेतकरी योगेश अशोक आहेर यांच्या मालकीचा महिंद्रा जिओ कंपनीचा ट्रॅक्टर याच पिकअप गाडीत टाकून लंपास करण्यात आले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य.
180721\18nsk_66_18072021_13.jpg
फोटो - १८विठेवाडीविठेवाडी येथील शेतकरी योगेश अशोक आहेर यांच्या मालकीचा महिंद्रा जिओ कंपनीचा ट्रॅक्टर याच पिकअप गाडीत टाकून लंपास करण्यात आले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य.