शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विठोबा महाराज यात्रोत्सवाची सांगता

By admin | Published: February 22, 2016 11:40 PM

दोन दिवसात झाल्या तब्बल ३०१ कुस्त्या : कळवण केसरीचा मानकरी ठरला पाचोऱ्याचा प्रवीण देशमुख

 कळवण : शहराचे ग्रामदैवत श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाची सांगता उत्साहात झाली. चार दिवस चाललेल्या यात्रा महोत्सवात शांततेची परंपरा कायम अबाधित राहिल्याने तालुक्यातील व शेजारील तालुक्यातील लाखो विठ्ठलभक्तांनी व यात्रेकरुंनी यात्रेला हजेरी लावली. गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात लाखो भक्तांनी श्रींच्या चरणी लीन होऊन आनंद द्विगुणित करीत यात्रेचा आनंद घेतला. कळवण केसरीचा मानकरी पाचोऱ्याचा प्रवीण देशमुख ठरला. दोन दिवसात तब्बल ३०१ कुस्त्या झाल्या कै. राजाराम पगार कुस्ती मैदानावर दोन दिवस चाललेल्या कुस्ती दंगलीतील यात्रा महोत्सवाच्या सांगता करणारी मानाची कै. पोपट पहिलवान पगार यांच्या स्मरणार्थ कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांच्याकडून २१ हजार रु पये व कळवण केसरीचा मानकरी पाचोऱ्याचा प्रवीण देशमुख ठरला. वेळेत पूर्ण न झालेल्या कुस्तीत गुणांच्या आधारे प्रवीण देशमुख यास विजेता घोषित करण्यात आले. उपविजेता भगूर येथील हर्षद सदगीर यास पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. अर्धातास चाललेल्या या कुस्तीत पंच सुधाकर पगार यांनी प्रवीण देशमुख यास विजेता घोषित केले. कळवण केसरीचा मानकरी प्रवीण देशमुखला एकवीस हजार रु पये रोख भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र पगार, भूषण पगार, भावराव पगार, खजिनदार रवींद्र पगार, मोतीराम पगार, संदीप पगार, सुरेश निकम यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. विठोबा महाराज यात्रा महोत्सव, मंदिर देवस्थान ट्रस्ट व कळवण नगरपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. राजाराम पगार मैदानावर दोन दिवस कुस्तीच्या दंगली आयोजित करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या कुस्ती दंगलीचे उद्घाटन हिंदकेसरी सुनील साळुंखे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून आनंद अग्रो ग्रुपचे संचालक उद्धव आहेर, शासकीय ठेकेदार, रमेश शिरसाठ, विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शिरोरे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, भावराव पगार, अजय मालपुरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या दिवसाअखेर तब्बल ३०१ कुस्त्या झाल्यात. त्यात आकर्षक भेटवस्तूसह बालगोपाळांच्या गुडीशेवच्या पुडावरील प्रारंभी कुस्त्या झाल्यात. शिवाय कुस्ती स्पर्धेला उपस्थित मान्यवरांकडून कुस्तीपटूंना बक्षिसे देण्यात आली. विविध मान्यवरांनी वैयिक्तक स्वरुपात कुस्ती स्पर्धांसाठी बक्षिसे दिली. त्यामुळे अमाप उत्साहात दोन दिवस कुस्तीची दंगल झाली. यात्रा महोत्सव समितीकडून ५०१ रुपयापासून ११००, २१००, ३१०० ,४१००, ५००१,११हजार व २१ हजार रुपयांपर्यंतची कुस्ती झाली. कुस्तीच्या दंगलीत राज्यातील मालेगाव, येवला, मनमाड, भगूर, नाशिक, पुणे, कोपरगाव, सातारा, सांगली, मुंबई, धुळे आदि ठिकाणच्या कुस्तीगिरांनी हजेरी लावून यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेणाऱ्या कुस्त्या केल्या. दोन दिवस चाललेल्या कुस्ती दंगलीत पंच म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, जितेंद्र पगार, परशुराम पगार, साहेबराव पगार, रवींद्र पगार, निंबा पगार, अण्णा पगार, शंकर निकम, मोतीराम पगार, गौरव पगार, साहेबराव पगार, अमोल पगार, अण्णा पगार, मनीष पगार, हरिश्चंद्र पगार, सुरेश निकम, मोय्योद्दीन शेख यांनी यशस्वी कामिगरी बजावत कुस्त्यांची दंगल यशस्वी पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (वार्ताहर)