शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’चा जयघोष... आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:54 AM

‘विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.., पांडुरंग विठ्ठला’च्या जयघोषामध्ये परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

नाशिकरोड : ‘विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.., पांडुरंग विठ्ठला’च्या जयघोषामध्ये परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.  विहितगाव येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात सोमवारी सकाळी खासदार हेमंत गोडसे, उत्तमराव कोठुळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर परिसरातून वृक्षदिंडी काढून गावात वृक्षारोपण करण्यात आले. हभप हर्षद गोळेसर, सुदाम धोंगडे व दिनेश मोजाड यांचे संगीत भजन व रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  दुपारी माउली सांप्रदायिक महिला मंडळाचे भजन, बाहेरगावच्या पहारेकºयांचे भजन झाले. सायंकाळी हरिपाठ, आरती व रात्री आळंदी येथील हभप अनिल महाराज तुपे यांचे हरिकीर्तन पार पडले. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसठी शिवाजी हांडोरे, डॉ. बाळासाहेब कोठुळे, नामदेव गाढवे पाटील, आत्माराम हगवणे, कैलास हांडोरे, विजय हांडोरे, रवींद्र हांडोरे, प्रकाश हगवणे, संजय हांडोरे, बाळु कोठुळे, अमर जमधडे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.देवळालीगावतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळी अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भजन व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पळसे बंगाली बाबा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. जेलरोड ज्ञानेश्वर नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मुक्तिधाम लक्ष्मीनारायण मंदिर आदि मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.सिडकोत आषाढी एकादशी साजरीसिडको : रायगड चौकातील बाजीप्रभूनगर येथील विठ्ठल-रु ख्मिनी मंदिरात तसेच परिसरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी एकदशीनिमित्त सोमवारी (दि.२३) मंदिरात महापूजा, महिलांचा हरिपाठ, दिंडी, कीर्तनाच्या कार्यक्र मासह विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. याप्रसंगी श्री विठ्ठल-रु ख्मिनी मंदिर कला, क्र ीडा, सांस्कृतिक मित्रमंडळाचे एकनाथ बुºहाडे, अरु ण पाटील, राकेश रहाणे व सर्व मंडळ पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिवसभरात मंदिरात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात भाविकांनी आरती व दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी अमर कुºहे, महेश वाघ, रवींद्र जाधव, ज्येष्ठ नागरिक नानासाहेब निकम, गोपीनाथ सोनवणे, अण्णा जाधव, विजय राहणे आदींसह विठ्ठल मंदिर मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.अभंगवाणीत भाविक मंत्रमुग्ध‘विठ्ठल तो आला आला’, ‘धागा धागा अखंड विणुया’, ‘सावळ्या विठ्ठला’, ‘देव माझा विठू सावळा’ यांसारखे विठ्ठलाचे विविध रूपातील वर्णन करणारे अभंग मैफलीत सादर करीत बागेश्री वाद्यवृंदातील ज्येष्ठ नागयिक मृदुला पिंगळे यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपनगर परिसरातील शांतीनगर विठ्ठल मंदिरात बागेश्री निर्मित ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘राजा पंढरीचा’ या विठ्ठलनामाच्या गजराने मैफलीस प्रारंभ झाला. नंतर ‘आषाढीची दिंडी पंढरीस चालली’, ‘सावळ्या हरि’, ‘चंद्रभागेच्या काठावरती’, ‘माउली माउली रूप तुझे’ यांसारखी सुरेल भजने तालासुरात सादर केली. प्रारंभी ज्येष्ठ पुजारी मार्तंड पिंगळे यांनी विधिवत पूजा केली. उत्तरोत्तर रंगलेल्या या मैफलीत गीतांना चारुदत्त दीक्षित (संवादिनी), नानासाहेब शेळके (मृदंग-तबला), साक्षी झेंडे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. याप्रसंगी रमेश केळकर, मयूर दीक्षित, सुनील सोनवणे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी