नांदगाव : आपण मातृभाषेवर प्रेम केले तरच ती समृध्द होईल, मराठी भाषेत आयुष्य समृध्द करणारे ग्रंथ आहेत, वाचनातले सातत्य व गोडी विद्यार्थ्यांनी टिकवावी व दैनंदिन व्यवहारात मराठीचा जास्त वापर करावा, असे प्रतिपादन कवी दयाराम गिलाणकर यांनी केले.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही.जे. हायस्कूलमध्ये कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा दिनानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. संकुलप्रमुख शशिकांत आंबेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी संजीव निकम, साहित्यिक प्रा. सुरेश नारायणे, संदीप जेजुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोविड १९च्या नियमांचे यावेळी पालन करण्यात आले. साहित्यिक प्रा. सुरेश नारायणे यांनी मराठी भाषेचा इतिहास व मराठी भाषेचे महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन गुलाब पाटील व संगीता शिंदे यांनी केले. आभार प्रकाश गरुड व प्राजक्ता आहेर यांनी मानले.फोटो- ०२ नांदगाव मराठी भाषा दिननांदगाव येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना कवी दयाराम गिलाणकर. समवेत संकुलप्रमुख शशिकांत आंबेकर, भास्कर जगताप, सुभाष लाड, संजीव निकम, सुरेश नारायणे.