त्यानुसार खेडे, रानवड, शिवडी, उगाव, वनसंगाव, ब्राह्मणगाव वनस, दावचवाडी, सावरगाव, रेडगाव बुद्रुक, नांदूर खुर्द, दारणा सांगवी, गोंडेगाव, नारायणगाव (खेरवाडी) दात्याने, ओणे, लासलगाव, पिंपळगावनजीक, टाकळी विंचूर, ब्राह्मणगाव विंचूर, विंचूर/विठ्ठलवाडी, सुभाषनगर, गोंदेगाव, रौळस पिंपरी, काथरगाव, सुंदरपूर, कोठुरे, नैताळे/रामपूर, सोनेवाडी बुद्रुक, रसलपूर, देवगाव /महादेवनगर, रुई /धानोरे, शिरवाडे वाकद, नांदगाव, करंजगाव, पिंपळगाव निपाणी/सावळी, बेहेड, आहेरगाव, उंबरखेड, वावी, शिरवाडे वणी, कारसूळ, मुखेड, अंतरवेली, भुसे, म्हळसाकोरे, कोळगाव, खेडलेझुंगे, गाजरवाडी, करंजी खुर्द/ब्राह्मणवाडे, नांदूरमधमेश्वर आदी ६५ गावांच्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मतदार यादी ग्राह्य धरणे शुक्रवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२०, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२०, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार, १ ते सोमवार, दि.७ डिसेंबर २०२० पर्यंत, प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस प्रकाशित करणे व अंतिम यादी प्रसिद्ध करणे गुरुवार, दि.१० डिसेंबर २०२० अशा पद्धतीने निफाड तालुक्यातील मतदार यादी ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी कार्यक्रम निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी जाहीर केला आहे.
निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:37 AM