नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी अखेरीस मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आहे, तर अंतिम मतदारयादी १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या दोन जागा रिक्त झाल्या आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपा नगरसेविका सरोज आहिरे यांनीदेखील राजीनामा देऊन राष्टÑवादी कॉँग्रेसकडून निवडणूक लढविली. दिलीप दातीर यांचा पराभव झाला असला तरी सरोज आहिरे मात्र निवडून आल्या आहेत. यानंतर महापालिकेने दोघांचे नगरसेवकपदाचे राजीनामे राज्य निवडणूक आयोगाला सादर केले होते. आता या प्रस्तावानुसार राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे.त्यानुसार प्रभागनिहाय मतदारयाद्या १५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, तर प्रारूप मतदारयाद्यांवरील हरकती आणि सूचनांसाठी २२ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. दि.३ डिसेंबर रोजी प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. तर मतदार केंद्रांची यादी ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल आणि १६ डिसेंबर रोजी प्रभागनिहाय तसेच मतदान केंद्रनिहाय अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ४ आॅक्टोबर रोजी जाहीर केलेली मतदारयादी अंतिम मानण्यात येणार आहे.अनेकांची नावे चर्चेतदोन्ही प्रभागांत निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. सिडकोतील प्रभाग २६ मध्ये माजी नगरसेवक दिलीप दातीर हे मनसेकडून पुन्हा रिंगणात उतरू शकतात. माकपाचे माजी नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे, शिवसेनेकडून निवृत्ती दातीर, सुधाकर जाधव, छबू नागरे, तर भाजपाकडून निवृत्ती इंगोले, अशोक पवार. प्रशांत कोतकर, कॉँग्रेसकडून विठ्ठल विभुते यांची नावे चर्चेत आहेत. नाशिकरोडमधील प्रभाग २२ मध्ये भाजपकडून रामदास सदाफुले, डॉ. संध्या शिरसाठ, राष्टÑवादीकडून माजी नगरसेवक वैशाली दाणी, जगदीश पवार, सुकदेव लोंढे, रविकिरण घोलप, शिवसेनेचे अमोल आल्हाट, कॉँग्रेसकडून सारिका कीर यांची नावे चर्चेत आहेत.
मनपाच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी मतदारयादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:40 PM