जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ व ६ डिसेंबर आणि १२ व १३ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. याअनुषंगाने १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त कार्यक्रमाच्या प्रारूप यादीच्या अनुषंगाने १५ डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने शनिवार, दि.५, रविवार, दि.६ आणि शनिवार, दि. १२ व रविवार, दि.१३ याकालावधीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी शासकीय पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000