अकोला- विधानसभा निवडणुकीवर अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील तीन गावांनी म तदानावर १00 टक्के बहिष्कार टाकला. आपल्या गावापर्यंत विकास पोहचलाच नाही, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दुर्गम भागातील पाच गावांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता. त्यात तळेगाव पातुर्डा, बाभूळगाव, तळेगाव वडनेर, डवला आणि सांगवी या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थाचे हाल होत असून, प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने येथील ग्रामस्थांनी बहिष्काराचा मार्ग अवलंबला होता. अधिकार्यांच्या मध्यस्थीनंतर तीन गावांतील मतदारांनी बुधवारी मतदान केले; मात्र तळेगाव पातुर्डा आणि बाभूळगाव येथील ग्रामस्थ मतदान केंद्राकडे फिरकलेच नाहीत. वाशीम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाच्या सिमेवर असलेल्या जनुना ग्रामवासी रस् त्याअभावी गैरसोय सहन करीत आहेत. दोन वर्षापूर्वी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्तगत या गावासाठी मंजुर झालेल्या रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. ते पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा आंदोलनाचा इशारा दिला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी १९ ऑगस्ट रोजी दिला होता. या इशार्यावर जनुना ग्रामवासी कायम राहीले. ग्रामस्थांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले; मात्र ग्रामस्थांनी दाद दिली नाही.
मतदारांनी उपसले बहिष्काराचे शस्त्र!
By admin | Published: October 16, 2014 12:16 AM