येवला : ‘ऐका हो ऐका, मतदारांनो ऐका, माता-भगिनींनो ऐका, मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही तेवढं बघून घ्या, बरं का, ऐका हो ऐका !’ हे शब्द मंगळवारी येवल्यातील चौकाचौकात प्रत्येकाच्या कानावर पडत होते, निमित्त होते पथनाट्याचे. स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे संस्कृतशिक्षक डॉ. प्रसाद शास्त्री कुळकर्णी यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘आमुची लोकशाही महान...’ हे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर करत येवलेकरांची मने जिंकून घेतली. यावेळी तहसीलदार नरेशकुमार बहिरम, नायब तहसीलदार आर. के. मालपुरे, श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष शरद नागडेकर, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्र माचे प्रमुख अशोक सोमवंशी, प्रा. डॉ. मनीषा गोसावी, प्रा. आशा डांगरे, प्रा. दीपक खरे, पं. डॉ. कुळकर्णी उपस्थित होते. जागरूक मतदार असेल तरच लोकशाही बळकट होईल. मतदानप्रक्रि या नवमतदारांनी समजून घ्यावी. मतदान हा ‘अधिकार आणि कर्तव्य’ अशा एकाच नाण्याच्या बाजू आहेत, असे विचार या पथनाट्यातून मांडण्यात आले. भारत निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवमतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्याकरिता या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले होते. पथनाट्याचा समारोप बसस्थानक परिसरात झालेल्या छोटेखानी कार्यक्र मात तहसीलदार बहिरम यांच्या भाषणाने झाला. युवक-युवतींनी विविध समस्या मांडल्या. विविध शंकांचे बहिरम आणि इतर अधिकाऱ्यांनी निरसन करून मार्गदर्शन केले. निवडणूक शाखेचे चेतन बनसोडे यांनी आभार मानले. (वार्ताहर) स्वामी मुक्तानंद महाविद्यालयातील अकरावी इयत्तेतील व्यवसाय अभ्यासक्र माच्या पूजा काळे, शुभांगी सोनवणे, सारिका दाणे, प्रियंका दाणे, गायत्री कपुरे, दुर्गा दाभाडे, मनीषा सोनवणे, राणी भोकरे, लक्ष्मी भालेराव, रेश्मा पवार, अंजली हजारे, भारती काथवटे, निराक्षी पवार, योगेश साळवे, राकेश शेळके, वैभव खैरनार आणि अश्विनी माळोकर यांनी मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य शहरातील विविध चौकांमध्ये सादर केले. दर्जेदार आणि कसदार संवाद, उत्कृट अभिनय आणि सोपे व मजेदार संवादांमुळे पथनाट्याला अधिकच रंगत आणली.
येवल्यात पथनाट्याव्दारे मतदार जागृती
By admin | Published: January 25, 2017 12:44 AM