शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कोरोनाला न घाबरता मतदार पडले घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 8:55 PM

सिन्नर : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सिन्नर तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोरोनाला न घाबरता मतदार उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येत होते. मात्र, उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणात नियम पाळले जात नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून आले. एकमेकांचे हस्तांदोलन, गळाभेट आणि टाळ्या देऊन गप्पाटप्पा अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसून आले. मतदारांनी कोरोनाला न घाबरता लोकशाहीचा हक्क बजावला. मात्र, काही प्रमाणात का होईना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसिन्नर तालुका : उत्स्फूर्त प्रतिसाद; उत्साहाच्या भरात नियमांकडे दुर्लक्ष

दुपारी दीड वाजेपर्यंत सिन्नर तालुक्यात सुमारे ५७ टक्के मतदान झाले होते. सकाळी साडेनऊ वाजता १५ टक्के, तर साडेअकरा वाजता ३७ टक्के मतदान झाले होते. तालुक्यात दुपारी ४ वाजेपर्यंत शांततेत मतदान सुरू होते. दुपारी ४ वाजेनंतर मतदानाचा वेग वाढला. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर, ३३८ प्रभागांंत ९२० जागा होत्या. त्यातील २३८ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या २८९ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. ६९२ जागांसाठी १७२९ उमेदवारांचे भवितव्य सायंकाळी साडेपाच वाजता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले.सकाळपासूनच तालुक्यात मतदानाचा वेग चांगला दिसून आला. पहिल्या दोन तासांंत १५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर, मतदानाचा वेग वाढतच गेला. वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ दिसून येत होती. ९० ग्रामपंचायतींच्या २८९ मतदान केंद्रांवर सिन्नर, एमआयडीसी व वावी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक वॉर्डात चुरशीची निवडणूक असल्याने एकेका मतासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आलेल्या मतदारांचे तापमान घेणे, ऑक्सिमीटरने मोजणी करणे आदी कामे केली जात होती. मात्र, मतदारांच्या तुलनेत आशा कार्यकर्त्या कमी असल्याने व दुपारी मतदारांनी गर्दी केल्याने सर्वांचीच तपासणी शक्य होत नव्हती. तालुक्यातील वडांगळी, वावी, दोडी, देवपूर, पंचाळे, सोमठाणे, पांगरी, मुसळगाव, माळेगाव, दापूर, नायगाव या मोठ्या गावांमध्ये प्रचंड चुरस दिसून येत होती. येणा-या मतदारांची हात जोडून विनवणी केली जात होती.शेवटच्या दोन तासांत मतदारांची बॅटिंगसिन्नर तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झाले होते. सकाळपासूनच मतदारांची गर्दी होती. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्याचे चित्र तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांंवर दिसून आले. शेवटच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मेहनत घेतली जात होती. प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर आणण्यासाठी प्रत्येकाचा आटापिटा सुरू असल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रांवर दिसून आले.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत