इंदिरानगर : विद्यार्थ्यांनी काढलेल्या मतदार जनजागृती फेरीत मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे घोषणा देत आवाहन करण्यात आले.नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. तसेच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गावंडे, मनपा प्रशासन अधिकारी उदय देवरे, तहसीलदार सदाशिव शेलार, चंद्रावती नरगुंदे यांची प्रमुख उपस्थिती होते. जाजू विद्यालय, डे केअर सेंटर शाळा आणि सेंट फ्रान्सिस विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदान करणे पवित्र काम आहे. याचा संदेश दिला, जाजू विद्यालयापासून सकाळी फेरीस सुरुवात करण्यात आली. अग्रभागी शाळांचे लेजीम पथक आणि झांज पथक सहभागी झाले होते. फेरी राजीवनगर, कलानगर चौक, श्रीकृष्ण चौक, श्रीराम चौक, वडाळा-पाथर्डी रस्ता, चेतना नगर, राणेनगर, किशोरनगर, विशाखा कॉलनी आदी परिसरातून फेरी काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपापले पालक आणि परिसरातील नागरिक, नातेवाईक यांना मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी आग्रह धरा, असे आवाहन केले. मुख्याध्यापक शरद गिते, नितीन पवार, संगीता गजभिये, माधुरी मरवट, संजय पाटील, नोडल अधिकारी प्रकाश शेवाळे, सहायक नोडल अधिकारी राजू मोरे, विजय कंवर आदींसह शाळांच्या शिक्षकांनी अभियानाचे संयोजनकेले.
शहरात मतदार जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:39 AM
विद्यार्थ्यांनी काढलेल्या मतदार जनजागृती फेरीत मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे घोषणा देत आवाहन करण्यात आले.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सहभाग : मतदान करण्याचे आवाहन