शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरणासाठी चौदा हजार मतदार करणार २८ तारखेला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 8:35 PM

मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्राध्यापकांच्या जागांसांठी एकुण २२५८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई विभागासाठी ५६३, पुणे विभागासाठी ६०९, औरंगाबाद विभागासाठी ३४१, नाश्कि विभागासाठी ३१२, नागपूर विभागासाठी २२७, अमरावती १४६ अशी मतदारांची नोंदणी झाली

ठळक मुद्देविद्यापीठ मुख्यालयात मतमोजणी होणार येत्या २८ रोजी राज्यातील विविध केंद्रांवर मतदान

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी होणा-या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून या निवडणुकीसाठी १४ हजार ४८९ मतदार नोंदणी झाली आहे. विद्यापीठ नियमानुसार अधिसभा, विद्यापरिषद, अभ्यासमंडळासाठी निवडणूक घेतली जाते. या निवडणुकीसाठी विद्यापीठाने अंतिम मतदारयादी जाहिर केली आहे.सदर यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिसभेसाठी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्राध्यापकांच्या जागांसांठी एकुण २२५८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई विभागासाठी ५६३, पुणे विभागासाठी ६०९, औरंगाबाद विभागासाठी ३४१, नाश्कि विभागासाठी ३१२, नागपूर विभागासाठी २२७, अमरावती १४६ अशी मतदारांची नोंदणी झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेतील एक याप्रमाणे पाच शिक्षकांकरीता निवडणूक होणार आहे. यासाठी एकुण ९७५९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. वैद्यकीय विद्याशाखेसाठी ४१३१,दंत विद्याशाखेसाठी १६९७,आयुर्वेद विद्याशाखेसाठी १७५२, व युनानीसाठी १८१ असे एकुण १९३३, होमिओपॅथीसाठी ८८९ तर तत्सम विद्याशाखेसाठी ११०९ मतदारांची नोंद झाली आहे.विद्यापीठाच्या विद्यापरिषदेसाठी वैद्यकीय, दंत,आयुर्वेद,होमिओपॅथी, आणि तत्सम विद्याशाखेतील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच प्राचर्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी २०० मतदार आहेत. वैद्यकीय शाखेसाठी ३६, दंत विद्याशाखेसाठी २५,आयुर्वेद व युनानीसाठी ४६, होमिओपॅथीसाठी ४० तर तत्सम विद्याशाखेसाठी ५२ मतदारांची नोंद झाली आहे.प्रत्येक विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासमंडळामध्ये एकत्रित सहा विभागप्रमुख असतील यामध्ये एकुण १८ विविध अभ्यासमंडळाकरीता सदस्यांची निवडणूक घेता येईल. यात आधुनिक वैद्यक शखेमध्ये ६८५,दंत विद्याशाखेसाठी २३१, आयुर्वेद विद्याशाखामध्ये ६६५, युनानी ७७३, होमिओपॅथी ५०८, नर्सिंगसाठी ६७, आॅक्युपेशनल थेरपीसाठी ४२, फिजिओथेरपीसाठी ३७ असे एकुण २२७२ मतदार नोंदविले गेले आहेत.विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी येत्या २८ रोजी राज्यातील विविध केंद्रांवर मतदान होणार असून ३० रोजी विद्यापीठ मुख्यालयात मतमोजणी होणार असल्याचे विद्यपीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कालिदास चव्हाण यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रuniversityविद्यापीठNashikनाशिक