नाशिक- अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बायपास झालेल्या आजी लिलाबाई लोया यांची मतदान करण्याची जिद्द आणि मुत्रपिंड विकारामुळे डाय्लिसीसवर असतानाही व्हीलचेअरवर मतदानासाठी आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश पाटील यांनी नाशिक शहरातील मराठा हायस्कूलमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावला.
मतदान करणे हे अत्यंत महत्वाचे राष्टÑीय कर्तव्य असून देशाच्या तसेच राज्याच्या भवितव्यासाठी ते आवश्यक असते. परंतु हे माहिती असून मतदानासाठी टाळाटाळ करणाºया किंवा मतदानाच्या दिवशीची सुट्टीची चंगळ उपभोगणाऱ्यांना मतदान करा असे सांगावे लागते. तरीही अनेक मतदार ऐकत नाही म्हणून सवलतींचे अमिष दाखवले जाते. परंतु राष्टÑीय कर्तव्याची खरी जाण असणारे मात्र प्रतिकुल परिस्थितीचा विचार न करताच स्वत: ची जबाबदारी कशी पार पाडतात. त्याची जाणिव या दोघांबरोबरच अनेक ज्येष्ठ आणि दिव्यांगामुळे संबंधीत उदासिन मतदारांच्या डोळ्यात अंजन टाकणारी ठरावी.
गंगापूररोडवरील लिलाबाई लोया यांचे वय ८१ आहे. त्यांची पंधरा दिवसांपूर्वीच गंगापूररोडवरील एका रूग्णालयात बायपास झाली आहे. वैद्यकिय सल्यानुसार त्यांना बाहेर पडण्यास मनाई होती मात्र तरीही त्या जिद्दीने व्हीलचेअरवर आल्या होत्या. त्यांचे पतीचे वय ८६ असून तेच या आजीबार्इंना घेऊन आले होते. होलाराम कॉलनी येथे राहणारे प्रकाश पवार यांची कथा तर त्यापेक्षा गंभीर आहे. त्यांना काही महिन्यांपूर्वी मुत्रपिंड विकार झाल्याने डायोलिसीस करण्यास सांगण्यात आले आहे. आठ दिवसांपासून डायोलिसीस सुरू असून त्यांना देखील डॉक्टरांनी बाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र त्यानंतर देखील ते स्वत: मतदानासाठी आले होते. मतदानाचा पवित्र हक्क बजावूनच ते परत गेले.नाशिक पूर्व मतदार संघात पंचवटी भागात देखील संतोष जाधव यांचा अपघात झाला असताना नांदुर येथील शाळा येथे मतदानासाठी आले होते. पंचवटीतच मखमलाबाद येथे विनायक तिडके हा युवक देखील जखमी झाले असताना मतदानासाठी आला होता.