नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंचायतींमधील सुमारे ३१८ रिक्त जागांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीदेखील सोमवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या, प्रभागनिहाय रचना व आरक्षणाची सोडत अशा विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. गेल्या आठवड्यात प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. ८ तालुक्यांतील २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत नामांकनाअभावी रिक्त जागांवर पोटनिवडणुका घेण्यासही आयोगाने हिरवा कंदील दर्शविल्यामुळे २०० ग्रामपंचायतींच्या ३१८ रिक्त असलेल्या जागांवरही ही निवडणूक घेण्यात येणार आहे....या ग्रामपंचायतींमध्ये होणार मतदाननाशिक- जलालपूर, गंगाम्हाळुंगी, महादेवपूर, पिंपळगाव (ग), त्र्यंबकेश्वर- सोमनाथनगर, साप्ते, मेटघर किल्ला, दिंडोरी- गवळवाडी, ननाशी, वनारवाडी, मालेगाव- मांजरे, कळवण- करंभेळ, देसगाव, खडकी, कोसवण, सरले दिगर, बागलाण- केरसाने, केळझर, भाक्षी, मुळाणे, देवळा- माळवाडी, फुलेमाळवाडी, मेशी, चांदवड- मंगरूळ. या ग्रामपंचायतींच्या ८१ प्रभागांत २१६ सदस्य व २४ सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे, तर जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींतील २६४ प्रभागांतील ३१८ रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.अचारसंहिता लागूआयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दि. ७ मे ते १२ मे या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यात येणार असून, दि. १४ मे रोजी छाननी, दि. १६ मे रोजी माघार व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार असून, २७ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे व दुसºया दिवशी मतमोजणी करण्यात येईल. आयोगाने सोमवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्याने रात्री १२ वाजेपासून आचारसंहिता लागू केली असून, त्या त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ती अस्तित्वात राहील, असे नमूद केले आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा करण्यास लोकप्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला आहे.
२२४ ग्रामपंचायतींसाठी मेमध्ये मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:20 AM