खेडलेझुंगे : येथील परम पुज्य तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि.१५) चुनाव पाठशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खेडलेझुंगे केंद्राचे खैरनार, गोरख वैद्य, डुंबरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. सी. रहाटळ, डी. बी. कडवे, गुजर यांनी मतदानद कार्यशाळेतील लोकांना मतदानाचे महत्व पटवून सांगितले. तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी बाबत ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच ग्रामस्थांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी चुनाव पाठशाळा समिती स्थापन करण्यात आली. चुनाव पाठ शाळेला उपस्थित ग्रामस्थांना त्यांना आलेल्या शंकांचे निरसन करुन घेतले. या पाठशाळेस विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
मतदान जन जागृती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:22 PM
खेडलेझुंगे : येथील परम पुज्य तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि.१५) चुनाव पाठशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठळक मुद्देखेडलेझुंगे : चुनाव पाठशाळेचे आयोजन