नाशिक : मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बोटाला शाई लावलेला सेल्फी सोशल माध्यमांवर अपलोड करीत नेटकऱ्यांनी मतदानाचा आनंद व्यक्त केला. मतदान केंद्राबाहेर काढलेला सेल्फी आपापल्या गु्रपवर शेअर करण्याबरोबरच अनेकांनी बोटाला शाई लावलेला फोटो प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला होता. लोकशाहीचा हक्क आणि सामाजिक कर्तव्याचे भान राखत अनेकांनी काढलेल्या सेल्फीमुळे सोशल माध्यमांवर अशा छायाचित्रांचा पाऊस पडला.लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक ठरते. सक्षम उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदानाचा टक्का वाढणे महत्त्वाचे असते. त्यात मतदानाचा टक्का वाढविण्यात तरुणांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे यावेळी तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सकाळपासून शहरात काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसत होत्या, मात्र तरीही तरुण-तरुणींचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. मतदान करण्यासाठी तरुणाईने सकाळपासूनच हजेरी लावली होती. तसेच प्रत्येक तरुण-तरुणीने मतदानानंतर सेल्फी काढत आपल्या मित्रपरिवाराला पाठविले.काहींनी सकाळीच आपले सेल्फी सोशल माध्यमांवर अपलोड केले. यामुळे दुपारनंतर एकेक करत असंख्य सेल्फींचा पाऊस सोशल माध्यमांवर पडला. बोटाला लावलेली शाई दाखवत ‘मी तर मतदान केले, आपणही करा’, ‘लोकशाहीला बळकट करण्यासाठी मी मतदान केले’, ‘मतदान करणे आपला हक्क आहे, मी केले तुम्ही पण करा’, ‘इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा असे बोट दाखविणे केव्हाही चांगले’ असे अनेक प्रकारचे प्रबोधनपर संदेश आपल्या सेल्फीसह सोशल मीडियावर टाकण्यात आले होते.माध्यमे सेल्फीमयसकाळपासूनच तरुणाईमध्ये मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. मतदानानंतर बोटाला शाई लावलेले छायाचित्र सेल्फी ठेवून विभानसभा निवडणुकीचे साक्षीदार असल्याचे दाखवून दिले. सकाळपासूनच व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसह सगळ्याच सोशल माध्यमांवर तरुण-तरुणींनी शाई लावलेल्या बोटासोबतचे सेल्फी अपलोड करत होते. कोणी आपल्या मित्र-मैत्रिनींसोबत तर कोणी आपल्या कुटुंबासोबत सेल्फी घेऊन अपलोड करताना दिसून आले. त्यात प्रथम मतदान करणाºया तरणांचा उत्साह तर शिगेला पोहोचला होता.
सोशल माध्यमांवर मतदान सेल्फीचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:20 AM