शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; २१ उमेदवार रिंगणात

By दिनेश पाठक | Published: June 25, 2024 6:11 PM

६९ हजार मतदान बजावणार हक्क; चौरंगी लढतीकडे लक्ष

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात बुधवारी (दि. २६) मतदान होत असून २१ उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढतीचे चित्र आहे. खास करून महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस पहावयास मिळाली. लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाशिक विभागातील ६९ हजार३१८ मतदार आपला हक्क बजावतील.निवडणूकीत शिंदेसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किशोर दराडे, उद्धवसेनेचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार तसेच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढतीचे चित्र आहे.

या निवडणूकीसाठी ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे सेनेचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असलेल्या अहमदनगर येथील किशोर दराडे यांनी देखील अर्ज दाखल केल्यानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रिंगणात असलेल्या अॅड. महेंद्र भावसार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने युतीतील बेबनाव दिसून आला. नाशिकमध्ये सर्वाधिक सुमारे २५ हजार मतदार आहेत. दाेघा पक्षाच्या नेत्यांनी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठका तसेच शिक्षकांचे मेळावे देखील घेतले होते. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची निवडणूक असल्याचे लक्षात घेऊन नाशिक तसेच जळगावचा दाैरा केला होता. मतदानासाठी शिक्षकांना पैसे दिले जात असल्याचा आरोपही महायुतीवर झाला. प्रकरण उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मिडियार व्हायरल केल्यानंतर बरेच वादळ उठले होते.

रिंगणातील उमेदवार असे

किशोर दराडे (शिंदेसेना), अॅड. संदीप गुळवे (उद्भवसेना), अॅड. महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस), भागवत गायकवाड (समता पार्टी), अनिल तेजा, अमृतराव शिंदे, इरफान नादिर, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागरदादा कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरुले, सचिन अगडे, दिलीप डोंगरे, आर. डी. निकम, डॉ. छगन पानसरे, रणजीत बोठे, महेश शिरुडे, रतनचावला, संतोष गुळवे (अपक्ष).

जिल्हानिहाय मतदारनाशिक २५३०२धुळे ८१५९जळगाव १३,१२२नंदुरबार ५३९३अहमदनगर १७,३९२एकुण ६९,३१८

टॅग्स :NashikनाशिकVotingमतदानElectionनिवडणूक 2024