सिन्नर : सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीसाठी (स्टाईस) रविवार, १७ जुलै रोजी मतदान होत आहे. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत होत असून सभासद कोणाच्या हाती स्टाईसची सत्ता सोपवतात याचा फैसला मतदानानंतर लगेच मतमोजणीअंती होणार आहे.प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत तीनही पॅनलने सामना रंगतदार अवस्थेत आणून सोडला आहे. माजी अध्यक्ष अविनाश तांबे, सुधा माळोदे-गडाख, पंडितराव लोंढे गटाने उद्योजक विकास पॅनलची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर माजी अध्यक्ष दिलीपराव शिंदे, किशोर देशमुख यांनी स्टाईस बचाव पॅनल निवडणूक रिंगणात उतरविला आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक नामकर्ण आवारे यांनी सहकार उद्योग विकास आघाडीद्वारे पॅनल निर्मिती केली आहे. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन पॅनलमध्ये चुरशीची लढत दिसत आहे.क्रॉस व्होटिंगची भीतीसंस्थेच्या निवडणुकीत ३४० मतदार मतदान करणार आहेत. तीनही पॅनलमध्ये अनुभवी उद्योजकांचा भरणा असल्याने मतदारांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण होण्यासारखी स्थिती असल्याचे दिसून येते. त्यामुळे उद्योजक मतदार तीनही पॅनलच्या उमेदवारांना पारखून मतदान करतील, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंगचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे. निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचल्याने मतदार क्रॉस व्होटिंग करतात की, पॅनल टू पॅनल मतदान करून कोणा एकाच्या हातात सत्ता देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर ४.३० वाजता मतमोजणी होणार आहे.
सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 10:32 PM
सिन्नर : सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीसाठी (स्टाईस) रविवार, १७ जुलै रोजी मतदान होत आहे. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत होत असून सभासद कोणाच्या हाती स्टाईसची सत्ता सोपवतात याचा फैसला मतदानानंतर लगेच मतमोजणीअंती होणार आहे.
ठळक मुद्दे तिरंगी लढत : मतदानानंतर होणार ताबडतोब मोजणी